कृषीथॉनच्या तारखा जाहीर

Jul 6, 2022

नाशिक ः गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रेक घेतलेल्या भारतातील अग्रगण्य कृषीथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा कृषीथॉन नव्या दमाने २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, कृषी पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते.


विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला देशात लौकिक प्राप्त झाला आहे. अशा या कृषिवलांना कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती करून देण्यासाठी १९९८ पासून कृषीथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेतील १५ व्या कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, आंतरराष्ट्रीय पातळीच्या उद्योगांची कृषी उत्पादनांना व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच शेतकरी व कृषी व्यवसायाशी निगडित संस्थांना भेट देऊन त्यांच्या गरजांची माहितीचे संकलन सुरू झाले आहे. दोन वर्षांपासून प्रदर्शन झाले नसल्यामुळे यंदा सहभागी संस्था आणि शेतकरी या दोघांत उत्साह दिसत आहे, असे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी सांगितले.
या वर्षी प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्य, देश आणि परदेशातील नामांकित ३०० हून अधिक कंपन्या व संस्था सहभागी होणार आहेत. दरवर्षी जवळपास दीड लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, कृषी अवजारे, ट्रॅक्‍टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल. ‘कृषीथॉन २०२२’ मार्फत शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News