नाशिक: पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक मोबिलिटी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत जपानी ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टोयोटाने आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV ‘टोयोटा अर्बन क्रूज़र एबेला’ नाशिकमध्ये अधिकृतपणे लाँच केली आहे. नाशिक येथील अधिकृत डीलर ‘वासन टोयोटा’ च्या वतीने पाथर्डी फाटा येथील शोरूममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या ई-व्ही (EV) गाडीची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सिटी सेंटर मॉल येथे एका भव्य सोहळ्यात या गाडीचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी वासन टोयोटाचे सी.ई.ओ. तेजेंदर बेदी, व्हाईस प्रेसिडेंट (सेल्स) अजय गुप्ता, व्हाईस प्रेसिडेंट (सर्व्हिस) श्रीकांत नायक, मॅनेजर मनमित सिंह व मार्केटिंग हेड सुशील वाघ या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या नवीन गाडीचे अधिकृत लाँचिंग पार पडले.
दमदार ६१ kWh बॅटरी अन् ५४३ किमीची ARAI प्रमाणित रेंज
पत्रकार परिषदेत गाडीच्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना वासन टोयोटाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही गाडी भारतीय ई-व्ही मार्केटमध्ये एक नवा आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल. यात ६१ kWh Lithium Iron-Phosphate बॅटरी पॅक देण्यात आला असून, ही गाडी ARAI प्रमाणित ५४३ किमी ची उत्कृष्ट ड्रायव्हिंग रेंज देते. यासोबतच ४९ kWh बॅटरीचा पर्यायही उपलब्ध आहे. यातील पॉवरफुल मोटर १२८ kW / १०६ kW ची ताकद आणि १८९ Nm चा इन्स्टंट टॉर्क निर्माण करते. गाडीचा एरोडायनॅमिक अंडरबॉडी डिझाइन आणि बॅटरी थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम रेंज वाढवण्यास मदत करते. दैनंदिन वापरासोबतच लांबच्या प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर ठरणाऱ्या या गाडीची रचना मजबूत ‘इम्पॅक्ट-ॲब्जॉर्बिंग बॉडी स्ट्रक्चर’ आणि विशेष बॅटरी प्रोटेक्शन फ्रेमवर करण्यात आली आहे.
प्रीमियम इंटेरिअर आणि लक्झरी अनुभव
या SUV चे डिझाइन स्पोर्टी आणि आकर्षक आहे. गाडीच्या कॅबिनमध्ये पॅनोरामिक रूफ, ड्युअल-टोन इंटेरिअर, १०.१ इंच इंटीग्रेटेड रेडिओ व डिस्प्ले युनिट, स्मूथ ड्राईव्ह गिअर शिफ्ट, व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग यांसारख्या आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या उत्तम सोयीसाठी इंटेरिअर अत्यंत आरामदायी आणि प्रशस्त ठेवण्यात आला आहे.
ADAS Level-2 सह प्रगत सुरक्षा फीचर्स
सुरक्षेच्या बाबतीत ही गाडी अत्यंत प्रगत आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ADAS Level 2 अंतर्गत येणारे स्मार्ट सेफ्टी फीचर्स दिले आहेत. यामध्ये ३६०° कॅमेरा, लेन असिस्ट, ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, हाय-टेन्साईल मटेरियल, ऑल-डिस्क ब्रेक आणि मल्टीपल एअरबॅग्ज समाविष्ट आहेत.
सिटी सेंटर मॉल येथे भव्य लाँचिंग सोहळा
सिटी सेंटर मॉल येथे पार पडलेल्या भव्य लाँचिंग सोहळ्यात नाशिककर आणि ऑटोमोबाईल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आगामी सणासुदीच्या काळात नाशिकमधील ई-व्ही प्रेमींसाठी ही गाडी एक सर्वोत्कृष्ट पर्याय ठरेल, असा विश्वास वासन टोयोटातर्फे व्यक्त करण्यात आला. ग्राहकांसाठी वासन टोयोटा (वासन नगर, मुंबई-आग्रा हायवे, पाथर्डी फाटा, नाशिक) येथील शोरूममध्ये गाडीची माहिती, बुकिंग आणि टेस्ट ड्राईव्हची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

