नाशिक: समिट एसआयएफने आज समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. (हे ठराविक अंतराने गुंतवणूक करण्याचे धोरण आहे, जे इक्विटी, डेट, इक्विटी व डेट डेरिव्हेटिव्ह्ज, इनव्हिट्स आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये डायनॅमिक पद्धतीने गुंतवणूक करते, ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून परवानगी असलेल्या साधनांवर मर्यादित शॉर्ट पोझिशन्सचाही समावेश आहे).
पारंपरिकदृष्ट्या, आर्बिट्राज धोरणे प्रामुख्याने कॅश-फ्युचर्स स्प्रेड्समधून निर्माण होणाऱ्या संधींवर अवलंबून राहिली आहेत. पण, आर्थिक बाजारपेठांचा विकास होत असताना विविध प्रकारची साधने, मालमत्ता वर्ग आणि बाजारपेठेतील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अशा संधी निर्माण होऊ शकतात.
मल्टी-आर्बिट्राज दृष्टिकोनाच्या संकल्पनेवर आधारित समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंड एकाच पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारच्या आर्बिट्राज संधी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. कोअर आर्बिट्राज या धोरणाचा पाया असला तरी सिंथेटिक आर्बिट्राज, इंडेक्स आर्बिट्राज, कमोडिटी आर्बिट्राज आणि स्पेशल सिच्युएशन्समधील अतिरिक्त आर्बिट्राज संधी या गुंतवणुकीच्या संधींची व्याप्ती वाढवण्याचे काम करतात.
हे धोरण बाजारपेठेतील उपलब्ध स्प्रेड्सचा लाभ घेताना बाजारपेठेतील मर्यादित डायरेक्शनल एक्स्पोजर राखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. बाजारपेठेच्या अंदाजांवर अवलंबून न राहता केवळ आर्बिट्राजच्या संधींवर लक्ष केंद्रित करून हे धोरण मध्यम मुदतीच्या कालावधीत भांडवल गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांना वेगळा दृष्टिकोन देऊ इच्छिते. या धोरणाचे व्यवस्थापन श्री. दीपक गुप्ता यांच्याद्वारे केले जाईल आणि बेंचमार्क ४० टक्के निफ्टी ५०० टीआरआय + ४० टक्के क्रिसिल शॉर्ट टर्म बाँड फंड इंडेक्स + २० टक्के आयकॉमडेक्स कंपोझिट इंडेक्स असेल.
या फंडच्या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत फंड मॅनेजर श्री. दीपक गुप्ता म्हणाले, “आर्बिट्राजकडे सहसा प्रामुख्याने कॅश-फ्युचर्स स्प्रेड्सच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण वेगवेगळ्या बाजारपेठा, आर्थिक साधने आणि परिस्थितींमध्ये किंमतीतील तफावतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. एसआयएफ फ्रेमवर्क आम्हाला पारंपरिक आर्बिट्राजसोबत सिंथेटिक फ्युचर्स, इंडेक्स, कमोडिटी आणि स्पेशल सिच्युएशन्सच्या माध्यमातून अशा आर्बिट्राज संधी शोधण्यासाठी विस्तृत व्यासपीठ उपलब्ध करून देते.
समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंडाच्या माध्यमातून आमचा भर बाजारपेठेच्या दिशात्मक अंदाजांवर विसंबून न राहता संभाव्य परताव्याचे अधिक व्यापक पर्याय तयार करण्यावर आहे. कोअर आर्बिट्राज पोर्टफोलिओला स्थिरता देईल, तर आकर्षक स्प्रेड्स दिसतील तिथे आम्ही पूरक धोरणांचा निवडक वापर करू. यासोबत जोखमीची शिस्त पाळणे देखील महत्त्वाचे आहे. आमचा कोणतीही विषम किंवा प्रमाणाबाहेर जोखीम न पत्करता अतिरिक्त परताव्याच्या संधी मिळवण्याचा मनसुबा आहे.”
एनएफओदरम्यान किमान गुंतवणुकीची रक्कम १०,००,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांच्या बाबतीत, एनएफओदरम्यान किमान गुंतवणुकीची रक्कम १,००,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. एसआयपी गुंतवणुकीसाठी समिट एसआयएफच्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये मिळून १०,००,००० रुपयांची किमान मर्यादा राखण्याच्या अटीवर अर्जाची किमान रक्कम १,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे.


