नाशिक : आयोडिनयुक्त मीठ हा काही फक्त सरकारने निर्धारित केलेल्या आयोडिनच्या मात्रेची पूर्तता करण्यासाठी बनवलेला एखादा घटक-पदार्थ नाही, तर हे मीठ त्याहूनही अधिक मोलाचे आहे. मिठाने अन्नाला हवी तशी चव आणता येते, तसेच आयोडिनयुक्त मिठाचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी लाभ होतात. मीठ हा स्वयंपाकात सर्वाधिक वापरला जाणारा घटक असल्याने, युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायजेशन (यूएसआय) शिफारशीनुसार मिठात आयोडिन मिसळले जाते. त्यामुळे आयोडिनची कमतरता भरून निघते व या कमतरतेमुळे होऊ शकणारे विकार (आयडीडी) टाळण्यास मदत होते. गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. भारतानेही मोठ्या प्रमाणावर आयडीडीवर नियंत्रण मिळवले आहे.
‘भारत आयोडिन सर्वेक्षण २०१८-१९’नुसार, सुमारे ७६.३ टक्के कुटुंबे किमान १५ भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) आयोडिन असलेले मीठ योग्य प्रमाणात वापरतात. मात्र, या सर्वेक्षणात असेही आढळले की फक्त २२.४ टक्के लोकांना आयोडिनयुक्त मीठ सेवनाचे फायदे माहीत आहेत. आयोडिनच्या योग्य पोषणामुळे गळू (गोईटर) होण्यापासून बचाव करता येतो, याची माहिती केवळ ६१.४ टक्के लोकांना आहे.
म्हणूनच, केवळ आयोडिनच्या आपल्या दैनंदिन आरोग्यातील भूमिकेची समज नसणे महत्त्वाचे नाही, तर त्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणेही गरजेचे आहे.
१. आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मदत
आयोडिनचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याने आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मदत होते आणि मानसिक विकासासाठी ते सहाय्यक ठरते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (एनआयएन) शिफारशीनुसार, किशोरवयीन व प्रौढांसाठी १४० मायक्रोग्रॅम प्रतिदिन, १ ते १२ वयोगटातील मुलांसाठी ९०-१०० मायक्रोग्रॅम प्रतिदिन आणि गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी २२०-२८० मायक्रोग्रॅम प्रतिदिन आयोडिनचे सेवन आवश्यक आहे.
२. निरोगी गर्भधारणेस मदत
गर्भधारणेदरम्यान व बाल्यावस्थेत आयोडिनची कमतरता झाल्यास बाळाच्या मेंदूवर व बौद्धिक विकासावर परिणाम होतो. आयोडिनच्या अभावामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते, तसेच हायपोथायरॉईडिझम होण्याचा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात आयोडिन घेण्याची गरज असते.
३. मुलांमध्ये मेंदूच्या विकासास सहाय्य
मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी, विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि लहान वयात मेंदूची वाढ होत असताना आयोडिन अत्यंत महत्त्वाचे असते. पहिले १००० दिवस, म्हणजे गर्भधारणा होण्यापासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ हा थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात आयोडिनची सर्वाधिक गरज असते. काही संशोधनांनुसार, हा काळ पाचव्या वर्षापर्यंत लांबू शकतो. मेंदूतील पेशींच्या निर्मितीला, मज्जासंस्थेच्या विकासाला आणि मज्जातंतूंच्या संरक्षक आवरणाला हे थायरॉईड हार्मोन मदत करीत असते. या टप्प्यावर आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यास मेंदूचा विकास कमी होऊ शकतो आणि बौद्धिक क्षमताही कमी होण्याची शक्यता असते.
४. एकूण आरोग्यास मदत
आयोडिन हा मेंदूच्या आरोग्यासाठी आणि थायरॉईडच्या चयापचयासाठी आवश्यक घटक आहे. शरीराच्या एकूण आरोग्यास ते मदत करते. आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी होते, ज्यामुळे शरीराचेच चयापचय मंदावते आणि थकवा येतो. योग्य प्रमाणात आयोडिन घेतल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि थायरॉईड चयापचय योग्य पद्धतीने कार्य करते. त्यामुळे शरीर एकूणच निरोगी राहते.
टाटा सॉल्ट १९८३ मध्ये सादर झाले. भारताच्या आयोडिन कमतरता विकारावरील लढ्यात हे मीठ मोलाची भूमिका बजावत आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावर ब्रँडेड आयोडिनयुक्त मीठ असा लौकिक असणाऱ्या ‘टाटा सॉल्ट’ने गुणवत्तेचा एक नवा मापदंड निर्माण केला आणि संपूर्ण देशभरातील घरांमध्ये सहज उपलब्ध झाले. आजही, टाटा सॉल्ट हे विश्वास, गुणवत्ता आणि निरोगी जीवनशैलीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रत्येक कणामधून पोषण पोहोचवण्याच्या आपल्या प्रयत्नांद्वारे, टाटा सॉल्ट भारताच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत आहे.



