ॲक्सिस म्युच्युअल फंडाचा एमएसएमई क्षेत्रात प्रवेश

Jun 30, 2026

नाशिक : भारतातील अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडाने, कॉर्पोरेट्स आणि एमएसएमईसाठी डिझाइन केलेल्या भारतातील पहिल्या एंड-टू-एंड डिजिटल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सोल्यूशन, ॲक्सिस अकाउंट प्लसच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. मजबूत नियंत्रण आणि अंगभूत गव्हर्नन्स प्रोटोकॉलसह एका सोयीस्कर, जलद सोल्यूशनद्वारे व्यवसायांना ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या पात्र डेट आणि लिक्विड योजनांमध्ये अतिरिक्त निधी अखंडपणे गुंतवण्यास सक्षम करते. व्यवसाय ऑपरेटिंग सरप्लसचे व्यवस्थापन करण्याबाबत अधिक धोरणात्मक होत असल्याने, गुंतवणुकीची उपलब्धता अधिक सोपी, अधिक कार्यक्षम आणि बदलत्या गरजांशी सुसंगत असणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड क्षेत्राची भूमिका भारताच्या आर्थिक परिसंस्थेमध्ये सातत्याने विस्तारत असतानाच हे नवीन पाऊल उचलण्यात आले आहे. त्याच वेळी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील भांडवल अद्याप पूर्णपणे उपयोगात आणले गेलेले नाही. चालू खात्यांमध्ये (करंट अकाउंट्स) अंदाजे 25 लाख कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर सामान्यतः कोणताही परतावा मिळत नाही. भारतात 31 लाखांहून अधिक सक्रिय कॉर्पोरेट्स आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स (LLPs) आहेत, तसेच भारत सरकारच्या उद्यम पोर्टलवर 8.6 कोटींहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नोंदणीकृत आहेत.

इतका मोठा विस्तार असूनही, म्युच्युअल फंडामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार नसलेल्यांचा (non-individual investors) सहभाग मर्यादितच राहिला आहे; यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या सुमारे 13.6 लाख इतकी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कॉर्पोरेट्स आणि MSMEs सह गुंतवणूकदारांच्या व्यापक वर्गासाठी म्युच्युअल फंड्सची उपलब्धता अधिक सुलभ आणि उपयुक्त करण्याची गरज आहे.

अनेक व्यवसायांमध्ये, पेमेंट सायकल, बाकी रक्कम, खेळत्या भांडवलाची गरज आणि नियोजित खर्च यासाठी अतिरिक्त निधी राखून ठेवला जातो. पूर्णपणे डिजिटल व्यवस्थापन प्रणालीद्वारे व्यवसायांना पडून असलेल्या निधीचा वापर करण्यास सक्षम करून खेळत्या भांडवलाची ही गरज पूर्ण करते.

उदाहरणार्थ, जर 100 कोटी रुपयांचे ताळेबंद (बॅलन्स शीट) आकारमान असलेल्या कंपनीकडे 10 कोटी रुपयांचे अतिरिक्त खेळते भांडवल असेल, तर ती कंपनी ॲक्सिस अकाउंट प्लस सुविधेद्वारे ही रक्कम एका महिन्याच्या कालावधीसाठी ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या डेबिट आणि लिक्विड योजनांमध्ये गुंतवू शकली असती. ॲक्सिस लिक्विड फंडाच्या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित, 31 मे 2026 रोजी संपलेल्या महिन्यात यातून अंदाजे 5.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकले असते (सुमारे 5.85% इतका वार्षिक परतावा गृहीत धरल्यास)*. कोणताही परतावा न मिळणाऱ्या करंट अकाउंटमध्ये (चालू खात्यात) ही रक्कम पाडून ठेवण्याऐवजी, ॲक्सिस अकाउंट प्लसमुळे कंपनीला आपल्या अतिरिक्त निधीवर परतावा मिळवणे शक्य झाले असते. अशा प्रकारे मिळालेल्या उत्पन्नाचा वापर व्यवसायाचे नियमित खर्च किंवा कामकाजाशी संबंधित खर्च भागवण्यासाठी केला जाऊ शकला असता, ज्यामुळे भांडवलाची एकूण कार्यक्षमता सुधारली असती.

ॲक्सिस अकाउंट प्लसचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये:
निष्क्रिय निधीवर उत्तम परतावा: निष्क्रिय निधी गुंतवण्यास आणि खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते, रिडम्प्शनवर कोणताही दंड नाही, एका दिवसापासून ते वर्षभरापर्यंत निधी ठेवण्याची लवचिकता, तसेच रोख रकमेच्या जलद उपलब्धतेसाठी रिडम्प्शनची रक्कम त्याच दिवशी जमा करण्याचा प्रयत्न.
अखंड डिजिटल प्रवास: ऑनबोर्डिंग, केवायसी, फोलिओ निर्मिती आणि गुंतवणुकीची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन करण्यास समर्थन देते, ज्यामुळे कागदपत्रे, प्रक्रियेतील विलंब आणि ऑफलाइन अवलंबित्व कमी होते.

· सुरक्षितता आणि विश्वास: गुंतवणूक सेबीद्वारे नियंत्रित आणि ॲक्सिस एएमसीद्वारे व्यवस्थापित केली जाते, ज्यामुळे विश्वासार्हता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.

मजबूत नियंत्रण: मेकर-चेकर वर्कफ्लोद्वारे व्यवहार व्यवस्थापित करण्यास व्यवसायांना सक्षम करते, जे अंगभूत गव्हर्नन्स प्रोटोकॉलसह अंतर्गत मंजुरी प्रक्रियेस समर्थन देते.

· सर्व्हिस कनेक्ट्स: नोंदणीकृत वापरकर्ते, मेकर आणि चेकर्स यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे व्यवहारांचे अपडेट्स मिळतात.

· एकत्रित दृश्यमानता: वन व्ह्यू डॅशबोर्ड दिला जातो जो गुंतवणुकीचा एकत्रित मागोवा घेण्यास अनुमती देते, ज्यामध्ये कंपनीच्या उपकंपन्या जोडण्याची आणि समूह-कंपनी स्तरावरील होल्डिंग्ज पाहण्याची क्षमता समाविष्ट आहे.

· समर्पित समर्थन: गुंतवणूक सर्वोत्तम राखण्यात मदत करण्यासाठी नियमित उत्पादन अपडेट्स आणि एका ठोस दृष्टिकोनासह, एसएमएस, ईमेल आणि व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध असलेला उत्तम व्यवस्थापक.

या लॉन्चप्रसंगी ॲक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ, बी. गोपकुमार म्हणाले, “भारत सरकारच्या उद्यम प्लॅटफॉर्मवर 8.6 कोटींहून अधिक एमएसएमई नोंदणीकृत आहेत आणि बँकांच्या करंट अकाऊंटमध्ये अंदाजे 25 लाख कोटी रुपये आहेत, ज्यावर सामान्यतः नगण्य किंवा कोणताही परतावा मिळत नाही. ही एक मोठी संधी आहे, ज्याचा आम्ही फायदा घेऊ इच्छितो.ॲक्सिस अकाउंट प्लसच्या माध्यमातून, भारतातील किमान 2-3% एमएसएमई आणि कॉर्पोरेट्सना लक्ष्य करून, मोठ्या प्रमाणावर या संधीचा फायदा घेणारी पहिली एएमसी बनण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सोल्यूशन एमएसएमईंना व्यवसायातील पडून असलेली रोकड सहजपणे आणि कार्यक्षमतेने गुंतवण्याची सुविधा देते, ज्यामुळे त्यावर परतावा मिळवण्याची क्षमता निर्माण होते. हे सोल्यूशन बिझनेस-ग्रेड वर्कफ्लो आणि मेकर-चेकर नियंत्रणे सक्षम करते, ज्याचा उद्देश आधुनिक उद्योगांची गती, प्रशासन आणि विकासाच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देणे हा आहे.”
अॅक्सिस अकाउंट प्लसच्या माध्यमातून, डिजिटल सुविधा, ऑपरेशनल नियंत्रण आणि व्यवहार क्षमता एकाच ठिकाणी एकत्र आणून, व्यवसायांच्या अतिरिक्त रोख व्यवस्थापनाच्या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्याचे अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे उद्दिष्ट आहे. अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे नवोपक्रमांना प्राधान्य आणि कॉर्पोरेट्स तसेच एमएसएमईंना अधिक कार्यक्षम आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते. अधिक जाणून घेण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी: https://transact.axismf.com/corporate-investments

अजून बातम्या वाचा..

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिनांक...

read more
नाशिकमध्ये एसआयपी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ, रजिस्ट्रेशन्सची आकडेवारी गुंतवणूकदारांची सावधगिरी दर्शवते

नाशिकमध्ये एसआयपी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ, रजिस्ट्रेशन्सची आकडेवारी गुंतवणूकदारांची सावधगिरी दर्शवते

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून दीर्घकाळात मोठी संपत्ती किंवा फंड उभा करू...

read more
मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
Breaking News