ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, स्मार्ट ऑटोमेशन आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्समधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणार
Nashik : भारतातील उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्र स्मार्ट फॅक्टरी आणि शाश्वत उत्पादन प्रक्रियेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, तैवान एक्सलन्स ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवानमधील
अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान भारतीय उद्योगांसमोर सादर करणार आहे. यामुळे भारतीय उत्पादकांना बुद्धिमान (इंटेलिजंट) उत्पादन व्यवस्थेच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी
मिळणार आहे .
22 ते 25 जुलै दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ऑटोमेशन एक्स्पो 2026 मधील तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त तैवानी ब्रँड्सची नवकल्पना प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनात AI एज कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स आणि स्मार्ट ऑटोमेशन तसेच औद्योगिक उपकरणे आणि घटक (Industrial Equipment & Components) या क्षेत्रांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. उत्पादकांची उत्पादकता वाढवणे, कार्यक्षमतेत सातत्य राखणे आणि अधिक शाश्वत उत्पादन व्यवस्था उभारणे यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान येथे सादर केले जाईल.
यंदाच्या सहभागातील प्रमुख आकर्षण म्हणजे 22 जुलै रोजी आयोजित करण्यात येणारा “तैवान एक्सलन्स प्रॉडक्ट लॉन्च”, ज्याची संकल्पना आहे – “तैवानच्या अॅडॅप्टिव्ह सोल्युशन्सद्वारे शाश्वत उत्पादन उभारणी.”
या कार्यक्रमात HIWIN, IBASE, SINTRONES आणि SYNTEC हे चार आघाडीचे तैवानी ब्रँड्स त्यांच्या नव्या औद्योगिक तंत्रज्ञानाचे अनावरण करतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आणि
बदलत्या गरजांशी जुळवून घेणाऱ्या (Adaptive) तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक स्मार्ट आणि शाश्वत उत्पादन कसे शक्य होत आहे, याचे प्रात्यक्षिकही ते सादर करतील.
2025 मध्ये तैवानच्या उत्पादन क्षेत्राने विक्रमी कामगिरी करत उत्पादन निर्देशांकात 17.9 टक्क्यांची वाढ नोंदवली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उच्च कार्यक्षम संगणन (High-Performance Computing) आणि प्रगत औद्योगिक तंत्रज्ञानासाठी असलेल्या जागतिक मागणीमुळे ही वाढ झाली असून, बुद्धिमान उत्पादन क्षेत्रातील तैवानचे नेतृत्व अधिक मजबूत झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
प्रदर्शनात AAEON, ADATA Industrial, Advantech,APLEX, Campro, FATEK, Getac, HIWIN, IBASE, ICP DAS, Jumbo Laser, KSS, Lanner, MCM, PLANET, Premio, Shuttle, SINTRONES, SYNTEC, TBI Motion, TOYO आणि Winmate या आघाडीच्या तैवानी कंपन्यांची 55 हून अधिक पुरस्कारप्राप्त उत्पादने पाहण्याची संधी मिळेल. औद्योगिक ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल कॉम्प्युटिंग,नेटवर्किंग, मोशन कंट्रोल आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग या क्षेत्रांतील अत्याधुनिक उपाययोजना येथे प्रदर्शित केल्या जातील.
भारत उत्पादन क्षेत्रात परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असताना, प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाची ओळख करून देत भारत आणि तैवान यांच्यातील तांत्रिक भागीदारी अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट तैवान एक्सलन्सचे आहे. तैवानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Economic Affairs – MOEA) पाठबळाने दिले जाणारे तैवान एक्सलन्स पुरस्कार संशोधन व विकास, डिझाइन, गुणवत्ता आणि विपणन या निकषांवर उत्कृष्ट ठरलेल्या “मेड इन तैवान” उत्पादनांना प्रदान केले जातात.
तैवान एक्सलन्स पॅव्हेलियन 22 ते 25 जुलै 2026 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत हॉल क्रमांक 6, बूथ I2–J2, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे सर्व अभ्यागतांसाठी खुले असेल.
तैवान एक्सलन्स विषयी
तैवानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने (MOEA) 1993 मध्ये तैवान एक्सलन्स पुरस्कारांची स्थापना केली. तैवानमधील सर्वाधिक नाविन्यपूर्ण उत्पादनांचागौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी पात्र उत्पादनांची संशोधन व विकास, डिझाइन, गुणवत्ता आणि विपणन या चार महत्त्वाच्या निकषांवर कठोर मूल्यांकन केले जाते. याशिवाय उत्पादन”मेड इन तैवान” असणे ही महत्त्वाची अट असते.
तैवान एक्सलन्स हे चिन्ह आज जागतिक स्तरावर गुणवत्ता, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि तैवानच्या उत्पादनक्षेत्रातील अभिनव क्षमतेचे प्रभावी प्रतिनिधित्व करते.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://teautomationexpo.com/






