यूटीआय लार्ज कॅप फंड ; प्रारंभी गुंतवले १० लाखांचे झाले 24.85 कोटी

Jul 22, 2026

नाशिक : यूटीआय लार्ज कॅप फंड हा भारतातील पहिला इक्विटी-केंद्रित फंड असून (ऑक्टोबर 1986 मध्ये सुरू करण्यात आला) गेल्या 38 वर्षांहून अधिक काळात संपत्ती निर्मितीचा उल्लेखनीय इतिहास या फंडाने घडवला आहे.यूटीआय लार्ज कॅप फंड ही एक खुली म्हणजेच ओपन एन्डेड इक्विटी योजना असून ती प्रामुख्याने आपल्या-आपल्या क्षेत्रात स्पर्धात्मक आघाडी असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवते. समभागांची निवड करताना हा फंड ब्लेंड गुंतवणूक शैलीचा अवलंब करतो. याचा अर्थ, ग्रोथ आणि व्हॅल्यू या दोन्ही प्रकारच्या समभागांचा समतोल साधत सर्व प्रकारच्या बाजारस्थितीत टिकून राहणारा संतुलित इक्विटी पोर्टफोलिओ तयार करण्याचा हा दृष्टिकोन आहे.

 

हा फंड मूलभूतदृष्ट्या सक्षम, नियंत्रित कर्जबोजा असलेल्या, सातत्यपूर्ण महसूल वाढ नोंदवणाऱ्या, नफाक्षमतेवर भर देणाऱ्या, भांडवलाच्या खर्चापेक्षा अधिक भांडवली परतावा देणाऱ्या आणि सातत्याने कार्यकारी रोख प्रवाह निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो. अशा कंपन्या भविष्यातील विस्तारासाठी मुक्त रोख प्रवाह निर्माण करू शकतात आणि सध्या असलेल्या समभागांचे मूल्य कमी करणे टाळू शकतात.

या ब्लेंड गुंतवणूक दृष्टिकोनामुळे यूटीआय लार्ज कॅप फंड स्पर्धात्मक आणि कार्यक्षम स्थान असलेल्या अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात जिथे—बाजार कंपनीच्या दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्याच्या क्षमतेचे किंवा किंमत निर्धारणाच्या सामर्थ्याचे कमी मूल्यमापन करतोअनुकूल मागणीचक्र, उद्योगातील एकत्रीकरण, नियामक अडथळ्यांचे निराकरण किंवा कंपनी-विशिष्ट घटक जसे की खर्चातील स्पर्धात्मकता आणि विवेकपूर्ण क्षमतेचा विस्तार यांमुळे कंपनीच्या वाढीचा प्रवास अधिक सक्षम होत आहे.
व्यवसाय भांडवल-केंद्रित असला, तरी कंपन्या विचारपूर्वक गुंतवणूक करतात आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणी करतात.कंपन्यांकडे उच्च रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (RoCE) दराने रोख प्रवाहाची पुनर्गुंतवणूक करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.संबंधित क्षेत्रातील तुलनात्मक मूल्यांकन आकर्षक आहे.
या दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदारांना दर्जेदार कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते.

यूटीआय लार्ज कॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, इटर्नल लिमिटेड आणि अॅक्सिस बँक लिमिटेड यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असून या पहिल्या 10 समभागांचा पोर्टफोलिओमधील हिस्सा सुमारे 52% आहे. या योजनेने 30 जून 2026 पर्यंत ग्राहक सेवा म्हणजेच कन्झ्युमर सर्व्हिसेस, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये तुलनेने अधिक गुंतवणूक केलेली आहे तर एफएमसीजी, ऊर्जा, कॅपिटल गुड्स, धातू आणि खाणकाम तसेच तेल, वायू आणि कन्झ्युमेबल फ्युएल्स क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी गुंतवणूक केलेली आहे.

30 जून 2026 पर्यंत या फंडाचा एकूण निधी 11,975 कोटी रु. हून अधिक आहे. हा फंड दीर्घकालीन भांडवली मूल्यवृद्धी आणि/किंवा उत्पन्न वितरणाचे उद्दिष्ट ठेवतो. वर नमूद केल्याप्रमाणे हा फंड शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणाचा अवलंब करतो आणि स्थापनेपासून आजपर्यंत दरवर्षी वार्षिक लाभांश वितरणाची परंपरा कायम राखली आहे. यूटीआय लार्ज कॅप फंडने आतापर्यंत एकूण सुमारे 4,500 कोटी रु. चा एकूण लाभांश वितरित केला आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे मेगा रिटेल क्रेडिट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिनांक...

read more
Breaking News