नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन

Jul 20, 2022

नाशिक  : नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने शनिवार आणि रविवार दिनांक २३ आणि २४ जुलै, २०२२ रोजी नाशिकच्या पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ज्युनिअर गटाच्या नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १४ वर्षे, १६ वर्षे,  १९ वर्षे आणि २० वर्षे मुलें आणि मुलीं अश्या चार वयोगटांचा समावेश आहे. या स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी वैज्ञनाथ काळे मो. ८३७८८३५९९९, संदीप फुगट मो. ९६८९३४२९७४, विजेंद्रसिंह ७४९८१८४१९२, साई स्पोर्ट्स मो. ९४२२९४३८६८ यांच्याशी संपर्क करून आपला सहभाग निश्चित करावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे असे आवहान जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी केले आहे.   अधिक माहितीकरीता वैज्ञनाथ काळे मो. ८३७८८३५९९९, अथवा संदीप फुगट मो. ९६८९३४९७४ यांच्याशी संपर्क करावा.  या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे असे आवहान आयोजकांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News