McDowell’s No. 1 सोडा तर्फे #ForeverNo1Yaari करणार साजरी ; केकेचे‘यारों’ गाणे होणार पुर्ननिर्मित

Aug 10, 2022

गाण्याची लिंकhttps://www.youtube.com/watch?v=fvSzKRE2Y10

नासिक – चांगल्या मित्रांच्या संगती मुळे आपल्या प्रगतीला चालना मिळते – असा विश्वास McDowell’s No. 1 चा आहे. मैत्रीचे आयकॉनिक गाणे म्हणजे प्रतिथयश गायक कै. के के यांनी गायले असून त्यांनी नेहमीच मैत्रीला अभिवादन केले जाते.

या वर्षी फ्रेंडशिप डे चे औचित्य साधून McDowell’s No. 1 सोडा तर्फे #ForeverNo1Yaari साजरी करण्यात येत असून या निमित्ताने केके ची मुले आणि त्यांचे दोस्त त्यांनी गायलेले ‘यारों’ गाणे पुर्ननिर्मित करणार आहेत. त्यांच्या आवाजाची आठवण ताजी करतांना त्यांचे म्हणजेच केकेंचे यार्स- लेस्ली लुईस, शान, पापोन, बेनी दयाल आणि ध्वनी भानुशाली यांनी ठरवले आहे की या सुंदर गाण्याचे सादरीकरण करुन ही अँथम के के यांना समर्पित करण्यात येणार आहे. या यारी अँथम गाण्याचे पुर्ननिर्माण केल्यामुळे त्यांचे फॅन, गायक, संगीतप्रेमी आणि मित्र हे यारों हे गाणे त्यांच्या सोशल हँडल्स वरुन नक्कीच रि शेअर करतील अशी या ‍मित्रांना खात्री आहे.

या सहकार्या विषयी बोलतांना डियाजिओ इंडिया च्या पोर्टफोलिओ मार्केर्टिंग हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट रुचिता जेठली यांनी सांगितले “ केके ने दोस्तीच्या भावनेला आवाज दिला होता आणि McDowell’s No. 1 Yaari Jam शी हा आवाज सुरुवातीपासूनच जोडला गेला होता. आंम्हाला त्यांची उणीव भासतआहे आणि त्यांची ही परंपरा साजरी करण्यासाठी आम्ही त्यांचे दोस्त असलेल्या शान, लेस्ली लुईस,बेनी दयाल, पापोन आणि ध्वनी भानुशाली व केके ची मुले यांच्याशी सहकार्य केले असून त्यांनी या फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने ‘यारों दोस्ती’ ही दोस्ती अँथम पुर्ननिर्मित केली आहे. आमचा असा विश्वास आहे की केके आमच्या आणि त्यांच्या दोस्तांच्या हृदयात नेहमीच असतील आणि देशभरांतील फॅन्स त्यांची #ForeverNo1Yaari ही परंपरा पुढे सुरू ठेवतील.”

आपल्या मित्राच्या आठवणीं बद्दल बोलतांना आघाडीचा भारतीय प्लेबॅक सिंगर शान म्हणतो “ मित्र आणि मैत्री नेहमीच माझ्या जीवनाची एक प्रेरक शक्ती ठरली आहे आणि मला असे वाटते की माझा बंधू केके आणि लेस्ली लुईस यांनी गायलेल्या या गाण्याशिवाय दुसर्‍या कोणत्याच गाण्याचा विचार करु शकत नाही. त्यांचे ‘यारों’ हे गीत दोस्तीची अँथम आहे. केके माझा चांगला मित्र होता आणि मी त्याला प्रेमाने काकेस म्हणत असे. मला त्याची खूपच आठवण येते. म्हणूनच ‘यारों’ गाण्याचे पुर्ननिर्माण करणेही आमच्यासाठी एक आयुष्यातील मोठी संधी होती. McDowell’s No. 1 ने आंम्हाला एकत्र आणून काकेस ला #ForeverNo1Yaari साठी अभिवादन करण्याची संधी दिल्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तो एक सुंदर व्यक्ती होता आणि त्याचे संगीत हे शतकानुशतके वाखाणले जाईल इतके चांगले आहे.”

या गाण्याच्या पुर्ननिर्माणा मध्ये प्रथमच के के ची मुले नकुल आणि तमारा ही पुढे येऊन हा आयकॉनिक ट्रॅक गाणार आहेत. या नवीन गाण्या विषयी बोलतांना नकुल कृष्णा म्हणतो “ मी यारों हे गाणे मित्रांबरोबर मौजमस्ती करत असतांना ऐकत असे आणि त्या गाण्याबरोबरच माझी प्रतिक्रिया पाहणे त्यांनाही आवडे. हे गाणे किती कालातीत आहे याची मला यामुळे आठवण झाली, मी नेहमीच वडीलांची आठवण काढत असतो आणि त्यांच्या बद्दल मी माझ्या मित्रांबरोबर बोलत असतो.” तामारा कृष्णा म्हणते “ यारों या गाण्याशी मी खूपच जवळची आहे केवळ ते गाणे वडीलांनी गायले आहे म्हणून नव्हे तर ते आमच्याशी संबंधित आहे म्हणून. वडीलांनी नेहमीच मैत्री चे मुल्य जाणले आणि मैत्री, एकत्र येणे, प्रेम आणि त्या करता असलेले मुल्य त्यांनी आंम्हाला शिकवले.”

या फ्रेंडशिप मंथ ची सांगता करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिग्गज गायक शान, ध्वनी, बेनी आणि पापोन बरोबर आपल्याला एकत्रित गातांना तर दिसतीलच पण त्यांच्या बरोबर के के ची मुले नकुल आणि तमारा ही आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे नांव McDowell’s No1 Yaari Jam-KK Forever concert असे असून याचे आयोजन केके चा वाढदिवस म्हणजे २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईतील फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला, मुंबई येथे करण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News