नशिक – आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत गेल्या दोन वर्षात सलग अव्वल स्थान पटकावणाऱ्या नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी आणखी एका यज्ञाला गवसणी घातली आहे. कझाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट २०२२ रोजी ‘आयर्नमॅन’ पूर्ण अंतराच्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत डॉ. देविका यांनी ३.८ किमी नदीमध्ये , १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन असे मिळून १२ तास ३५ मिनिटांच्या विक्रमी वेळेत ‘ट्रायथलॉन’ पूर्ण करून सर्वात वेगवान ‘भारतीय महिलेचा मान मिळविला आहे.या यशाबद्दल बोलताना डॉ. देविका पाटील म्हणाल्या, की कझाकिस्तान मधील वातावरण २२-२३ अंश सेल्सियस तापमानात होते.
हे तापमान आमच्यासाठी अनुकूल होते. परंतु सायकलिंग करताना १८० किमीचा टप्पा पार करताना आमच्यासमोर जोरदार वाऱ्याचे आव्हान होते. कझाकिस्तानमध्ये झाडांची संख्या
कमी असून, समतल प्रदेश अधिक आहे. पूर्ण मार्गावर वाऱ्याचा वेग अधिक होता आणि वारा सतत दिशा बदलत होता. आम्हाला सायकलिंगसाठी अधिक शाक्ती लागत होती. हे सर्वात मोठे आव्हान होते. डॉ. देविका म्हणाल्या, कझाकिस्तान मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला. यंदा तब्बळ १२० भारतीय एथलिट्सनी सहभाग घेतला होता. कझाकिस्तानचे सर्वाधिक स्पर्धक सहभाग झाले होते.
भारतीय स्पर्धक दुसऱ्या क्रमांकावर होते. भारतीय स्पर्धकांचा सहभाग वाढल्याची सकारात्मक गोष्ट दिसून आली.नाशिक येथील सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञूञ डॉ. शरद पाटील व डॉ.अनिता पाटील यांची डॉ. देविका या कन्या आहेत. नाशिक मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रवरा येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेतले. २०२० मध्ये मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. देविका यांनी मानसोपचार तज्ञ म्हणून काम केले. सध्या त्या क्रीडा मानसोपचार तज्ञ म्हणून काम करीत आहेत. डॉ. देविका यांना पुणे येथील चैतन्य वेल्लाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. कझाकिस्तानच्या स्पर्धेत प्रशिक्षक चैतन्य वेल्लाळ यांच्यासह ३० एथलिट्स सहभागी झाले होते. यापूर्वी त्यांनी चार अर्ध आयर्नमॅनस्पर्धा जिंकल्या आहेत.
पुणे येथे झालेल्या अर्ध आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. महाविद्यालयीन जिवनापासून डॉ. देविका विविध सायकल स्पर्धा, मॅरेथॉन व दीर्घ अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सातत्याने भाग घेत आहे. त्यांनी गिर्यारोहण आणि सायकल चालवण्यापासून सुरुवात केली. ही आवड विकसित करण्यास आणि त्याचा पाठपुरावा करण्यात डॉ. हरद पाटील यांचा मोठा वाटा आहे. वैद्यकीय अभ्यासाचा समतोल साधत असताना ४ वर्षांपूर्वी ट्रायथलॉन्स करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून अनेक कार्यक्रमांमध्ये पोडियम फिनिशर म्हणून सातत्य राखत आहे. पूर्ण अंतराच्या ट्रायथलॉनसाठी प्रशिक्षण हे आव्हानात्मक काम आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेसोबत प्रशिक्षणासाठी आठवड्याला दररोज दोन ते अडीच तास आणि आठवड्याच्या शेवटी पाच ते सात तास द्यावे लागली. तंदुरुस्त राहण्यासाठी त्या विशिष्ट आहार घेत असून, झोपेच्या वेळाही पाळत आहे.
यंग इंडियन्स–नाशिकतर्फे एआयच्या जबाबदार वापरावर विशेष व्याख्यान”
Nashik : यंग इंडियन्स (Yi) नाशिक चॅप्टरतर्फे, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (IEI)यांच्या...


