“माज…फिनिश इट” चित्रपटाचे नाशिकमध्ये जोरदार प्रमोशन

Jul 30, 2019

अनुष्का Imagin फिल्म्स प्रस्तुत, आशिष कैलास जैन कृत “माज…फिनिश इट” चित्रपटाचे आज दिनांक २७  जुलै रोजी चित्रपटातील कलाकारांच्या व तंत्रज्ञाच्या  उपस्थितीत नाशिक येथे  जोरदार प्रमोशन  करण्यात आले.

जमिनी विकून अचानक आलेल्या पैश्यामुळे आयुष्य काय वळण घेऊ शकते या विषयावर आधारित असलेला “माज…फिनिश इट” चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मुळचे हॉटेल व्यावसायिक असलेले संदीप पोपट  टकले यांची ही प्रथम निर्मिती आहे.

या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमित नितीन रेखी आणि अर्चना संकेत ही जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून या सीने जगतात आपले नशीब अजमावणार आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटात  नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, वृंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बनकर, जगदीश कुंभार, यासारखी मातब्बर मंडळी सुद्धा आहे. चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सुद्धा एक छोटीशी भुमिका चित्रपटात साकारली आहे.

या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संदीप रोकडे आणि योगेश कांबळे या जोडीने केले असुन प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि रेश्मा सोनावणे यांनी चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटात एकूण दोन गाणी असुन एक प्रेमगीत आणि एक Item Song आहे. प्रेम गीत नवख्या जोडीवर चित्रित करण्यात आले आहे आणि आयटम song मध्ये करिष्मा वाबळे यांनी आपल्या अदा सादर केल्या आहेत. प्रेम गीत आशिष जैन यांनी लिहिले असुन Item Song साईनाथ पाटोळे यांनी लिहिले आहे.

गिरीश रमेशजी गादिया हे या चित्रपटाचे सहनिर्माते असुन मंगेश जोंधळे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे. आशिष तिवारी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे. शीतल माहेश्वरी यांनी वेशभूषाकार तर अनिकेत काळोखे यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले आहे. कला दिग्दर्शक म्हणून वैभव शिरोळकर यांनी काम पाहिले आहे. निर्मिती  व्यवस्थापक म्हणून नितीन आठरे यांनी काम केले. दर्शन Productions द्वारा हा चित्रपट वितरीत करण्यात येणार आहे…

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News