‘झी टॉकीज’वर अवतरणार ‘राक्षस’!!!

Aug 4, 2019

मराठी नाटक, कथाबाह्य कार्यक्रम इत्यादी अनेक दर्जेदार सादरीकरण’झी टॉकीज’वर पाहायला मिळतात. अर्थात, मराठी सिनेसृष्टीतील हीसर्वोत्तम वाहिनी, आजही दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊनयेण्यात कुठेही मागे नाही. जुन्या व नव्या चित्रपटांची सांगड घालत, एकउत्तम मेजवानी ही वाहिनी सर्वांसाठी पेश करते.  आजवर अनेक मराठीचित्रपटांचे ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ या वाहिनीवर प्रेक्षकांनीपाहिलेले आहेत. असाच आणखी एक प्रीमियर ऑगस्टच्या पहिल्यारविवारी ‘झी टॉकीज’ घेऊन येत आहे. ‘राक्षस’ ही एका त्रिकोणीकुटुंबाची चित्तथरारक कथा आहे. हा चित्रपट, रविवार ४ ऑगस्ट रोजी,दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीजवर पाहता येईल. 

अविनाश (शरद केळकर) हा एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी जंगलातगेलेला असतांना, तो तिथेच हरवतो. त्याच्या काळजीपोटी त्याची पत्नीइरावती (सई ताम्हणकर) व मुलगी अरण्या त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नकरू लागतात. संपूर्ण चित्रपटात, या दोघींची अविनाशला शोधण्यासाठीसुरू असलेली धडपड पाहायला मिळते. चित्रपटात जंगलातील प्रसंगफार महत्त्वाचे असल्याने, या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण जंगलातकरण्यात आले आहे. मायलेकींचे हे शोधकार्य सुरू असतांना, कथांचेएक पुस्तक त्यांना फार उपयोगी पडते. अरण्या म्हणजेच अरु,बाबांसोबत जंगलात गेलेली असतांना, तिला हे पुस्तक सापडलेलेअसते. या पुस्तकाच्या आधारे, अविनाश नाहीसे होण्याचे गूढसोडवण्याचा त्या दोघी आटोकाट प्रयत्न करतात. अर्थात, अविनाशनेअदृश्य होण्याव्यतिरिक्त इतर काही रहस्यांचा उलगडा या शोधकार्यातहोत आहे, हे त्या दोघींच्या लक्षात येते. 

अविनाशला शोधून काढण्यात या दोघी यशस्वी होतील का? उलगडतजाणारे ते दुसरे रहस्य कुठले असेल, हे जाणून घेण्यासाठी पाहायलाविसरू नका, ‘राक्षस’ या चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’, फक्तआपल्या लाडक्या ‘झी टॉकीजवर’!! 

 

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News