हंगामा प्ले च्या श्री कामदेव प्रसन्न या विनोदी मराठी वेब सिरीज मध्ये भाऊ कदम आणि सागर कारंडे यांची खास भुमिका

Aug 9, 2019

१० ऑगस्ट २०१९: हंगामा या भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन कंपनीने आज श्री कामदेव प्रसन्न हा नवीन मराठी ओरिजिनल शो सुरू केला. मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या शोमध्ये महाराष्ट्राचा विनोदवीर भाऊ कदम हा भगवान कामदेवाच्या रूपात दिसणार असून लोकप्रिय मराठी कलाकार सागर कारंडे, भाग्यश्री मोटे, विनय येडेकर आणि आशा शेलार यांच्याही त्यात भूमिका आहेत. हा शो ३५ वर्षांचा मिलिंद या अंतर्मुख मुलाच्या धमाल साहसांभोवती फिरतो. तो मुलींबाबत लाजाळू आहे. एक महान हस्तक्षेप चुकल्यानंतर प्रेमाचा देव असलेल्या भगवान कामदेवाला त्याला मदत करण्यासाठी पाठवले जाते. मिलिंदचे आयुष्य विनोदी पद्धतीने अडचणीत येते परंतु तो त्याचा मित्र होतो. श्री कामदेव प्रसन्नची निर्मिती हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठी यांनी केली असून दिग्दर्शन संदीप नवरे यांचे आहे.

आजपासून सुरू होणारा हा शो हंगामा प्ले या हंगामाच्या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. आपल्या उत्तम वितरण नेटवर्कचा फायदा घेऊन हंगामा १९० पेक्षा अधिक देशांमधील सुमारे ६० दशलक्षपेक्षा अधिक प्रेक्षकांपर्यंत हा शो पोहोचवेल. श्री कामदेव प्रसन्न हा शो हंगामा प्लेद्वारे वोडाफोन प्ले, आयडिया मूव्हीज अँड टीव्ही, एअरटेल टीव्ही, अॅमेझॉन फायर स्टिक टीव्हीवर, टाटा स्काय बिंग, शेअरइट आणि अँड्रॉइड टीव्हीवरही उपलब्ध असेल. याशिवाय, हंगामाच्या शाओमीसोबतच्या भागीदारीमुळे प्रेक्षकांना शो माय टीव्हीवर हंगामा प्लेद्वारे पाहता येईल.

श्री कामदेव प्रसन्नच्या अनावरणाच्या निमित्ताने बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, खास कथा आणि आकर्षक कथाकथन तसेच वैश्विक अपील हे हंगामाच्या ओरिजिनल प्रोग्रामिंगला चालना देणारे घटक आहेत. श्री कामदेव प्रसन्न हा आमचा मराठीतील दुसरा ओरिजिनल शो असून तो जगभरातील लोकांना आकर्षित करेल अशी आशा आहे

श्री कामदेवाच्या भूमिकेतील भाऊ कदम म्हणाले की, ”भगवान कामदेवाची भूमिका पडद्यावर साकारणे ही अत्यंत गंमतीची आणि धमाल गोष्ट होती. या शोमध्ये एकही कंटाळवाणा क्षण नाही आणि त्याच्या विनोदाचे प्रेक्षक नक्कीच कौतुक करतील. असे मला वाटते.

आपल्या भूमिकेबाबत बोलताना सागर कारंडे म्हणाला की, विनोदवीर भाऊ कदम आणि सर्व कलाकारांसोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. श्री कामदेव प्रसन्न ही भगवान कामदेव पृथ्वीवरील लाजऱ्या तरूणाच्या आयुष्यात येतो तेव्हा काय होते त्याची विनोदी कथा आहे. मला प्रेक्षकांचे मत जाणून घेण्यात उत्सुकता आहे आणि विविध माध्यमांतून त्यांचे मनोरंजन करत राहता येईल, अशी आशा वाटते.

श्री कामदेव प्रसन्न हंगामा प्ले आणि त्याच्या पार्टनर नेटवर्क्सवर आजपासून उपलब्ध आहे.
त्याचा ट्रेलर येथे पाहा – http://bit.ly/2P22pNF
हा शो येथे पाहा – http://bit.ly/2GRuX5B

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News