‘विक्रम वेधा’ चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर होणार रिलीज

Sep 5, 2022

Nashik : या हंगामातील बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट टिझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागविले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात सिनेमातील दोन्ही ऍक्टर्स आजवर कधीही न पाहिलेल्या रुपात दिसत आहेत, त्यामुळे ‘विक्रम वेधा’चे मेकर्स चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार ८ सप्टेंबर रोजी सिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहे.

पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘विक्रम वेधा’चे नवे पोस्टर या सिनेमाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहे. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. या सिनेमात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे पोस्टरवरून जाणवते. पोस्टरवर गन हातात घेतलेला हृतिक स्लाइडिंग पोजिशनमध्ये आणि दुसरीकडे पोलिसी रुपात किलिंग एक्सप्रेशन्स देत शुटिंग पोजिशनमध्ये सैफ दिसतो. पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, त्यामुळे नवे पोस्टर लक्षवेधी असून हृतिक आणि सैफ यांच्या चाहत्यांच्या मनात उत्साह वाढवणारे आहे.

‘विक्रम वेधा’ची प्रस्तुती गुलशन कुमार, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, भूषण कुमार, एस. शशिकांत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.

शॉप्सीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. २०२३ पर्यंत गाठण्याचे लक्ष्य वेळेआधीच पूर्ण करत शॉप्सीने या वर्षभरात १०० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. ग्राहकांची सखोल माहिती घेऊनच या व्यासपीठाचे काम चालते. त्यामुळे ग्राहकांना, विशेषत: द्वितीय श्रेणी शहरे आणि त्यापुढील बाजारपेठांमधील ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार उत्पादने देणे शक्य होते. मागील सहा महिन्यात शॉप्सीवर विकल्या गेलेल्या उत्पादनांच्या संख्येत २.२ पटींची वाढ झाली आहे. तर ग्राहकसंख्येतही २.२ पटींची वाढ झाली आहे.
ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या उत्पादनांची व्यापक श्रेणी वाजवी दरात उपलब्ध करून देतानाच एक मूल्याधारित आणि विश्वासार्ह व्यासपीठ ही ओळख कायम राखण्यासाठी शॉप्सी सातत्याने प्रयत्न करत आहे. देशातील उद्योगक्षेत्रासाठी एक समान स्पर्धात्मक स्थिती निर्माण करण्यासाठी समुदायाची उभारणी करणे ही आपली बांधिलकी शॉप्सीने कायम जपली आहे. जुलै २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासूनच शून्य कमिशन बाजारपेठेच्या माध्यमातून भारतभरात डिजिटल कॉमर्स उपलब्ध करून देणे हे शॉप्सीचे उद्दिष्ट आहे. आजघडीला, या व्यासपीठावर २.५ लाखांहून अधिक विक्रेते देशभरातील ग्राहकांना १५० दशलक्ष उत्पादने पुरवत आहेत.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News