Edelweiss Tokio Life ने नाशिकमध्ये आपले स्थान केले बळकट

Sep 23, 2022

Flexi Savings Plan योजना कार्यान्वित

नाशिक : नवीन पिढीतील एडलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्स या आयुर्विमा कंपनीने आज सांगितले की, नाशिक ही आमच्या महत्त्वपूर्ण व्यावसायिक बाजारपेठांपैकी एक आहे आणि अलिकडच्या वर्षांत त्यात वेगाने वाढ होत आहे. कंपनी आता या भागात आपले स्थान आणखी बळकट करून त्याचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. त्याच प्रमाणे नाशिकच्या रहिवाशांसाठी विम्याचा प्रवेश सुकर करण्यासाठी आणखी सल्लागारांची नियुक्ती करण्याचा विचार करत आहे.

एडलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी अनुप सेठ म्हणाले, “मेट्रो शहरांच्या पलिकडे जात, आम्हाला नाशिकमध्ये मजबूत वाढीचा कल अपेक्षित होता आणि आम्ही योग्य वेळेत या शहरात गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीचे परिणाम दिसून येत आहेत कारण नाशिक केवळ विमा हब बनले नाही तर आमच्यासाठी आशादायक वाढ देखील दर्शवत आहे. लोकांच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आम्ही येथे सुरुवात केली आणि ४,००० पेक्षा जास्त ग्राहकांना विम्याच्या कक्षेत आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.नाशिकच्या सर्व ६० लाखांपेक्षा जास्त लोकांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आमचे सल्लागार आणि कर्मचाऱ्यांना योग्य मूल्ये आणि त्याची विभागणी समजून घेणे ही आमची आकांक्षा आहे. ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

नाशिकमध्ये शाखा सुरू करण्याव्यतिरिक्त, जीवन विमा कंपनी शहरातील त्याच्या ३ व्यावसायिक भागिदारी कार्यालयांद्वारे देखील कार्यरत आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या उद्योजकीय स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी ‘बिझनेस पार्टनर’ नावाचा एक अनोखा इनक्यूबेटर कार्यक्रम उपलब्ध करून दिला आहे. सातत्यपूर्ण आणि प्रत्यक्ष वाढीद्वारे, कंपनीचे विकास व्यवस्थापक (व्यक्ती जे सल्लागारांची नियुक्ती आणि व्यवस्थापन करतात) टप्प्याटप्प्याने

व्यवसाय भागीदार बनून त्यांची स्वतंत्र कार्यालये उघडू शकतात. कंपनीचे पहिले व्यावसायिक भागिदारी कार्यालय नयना पाटील यांनी नाशिकमध्ये सुरू केले होते आणि ते त्यांच्यामार्फत चालू आहे.
लाइफ इन्शुरन्स कंपनीला महिला सल्लागारांची नियुक्ती करण्यात आणि त्यांच्यासोबत काम करण्यातही मोठे यश मिळाले आहे, जे देशभरात साधारणपणे नव्हते.

एडलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी अभिषेक गुप्ता म्हणाले, “भारतात आयुर्विम्याची खरेदी आणि विक्री पारंपारिकपणे पुरुष करतात. महिलांना विमा खरेदी-विक्रीच्या मुख्य प्रवाहात आणावे असे आम्हाला नेहमीच प्रकर्षाने वाटत आले आहे आणि या आघाडीवर नाशिक ही आमची यशोगाथा ठरणार आहे. नाशिकमधील आमच्या एकूण सल्लागारांपैकी जवळपास ४५% महिला आहेत. देशभरात आमचे स्थान बळकट करत असतांना आम्ही या यशोगाथेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू.”

एडलवाईस टोकियो लाइफने अलीकडेच फ्लेक्सी सेव्हिंग्ज प्लॅन नावाचे नवीन उत्पादन देखील लॉन्च करून पर्सनलायझेशन क्षेत्रात प्रवेश केला आहे. हे उत्पादन सर्वायव्हल ऑफ अॅक्रुअल बेनिफिट नावाचे एक नाविन्यपूर्ण पर्यायी वैशिष्ट्य ऑफर करते. ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा जुळवता याव्यात यासाठी आवश्यक तितक्या वेळा त्यांच्या देय लाभ रकमेची वेळ बदलण्याची सुविधा यामध्ये मिळते.

 

 

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News