टीम इंडिया टी२० वर्ल्ड कप जिंकावे म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये महायज्ञ

Oct 25, 2022

• ‘विजयी भव’ महायज्ञात सह seeभागी होण्याचे व योगदान देण्याचे भारतीयांना आवाहन
• सामन्याच्या दिवशी देशभर १०१ यज्ञांचे आयोजन करण्यात येणार
www.cheerforindia.org या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह यज्ञाचे स्ट्रीमिंग

त्र्यंबकेश्वर : #vijayibhavaindia या एका विजयध्वनीच्या माध्यमातून भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि पुन्हा एकदा आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आणि www.cheerforindia.org या वेबसाइटवर यज्ञाचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. सामान्य लोकही या प्लॅटफॉर्मवरून या पुढील यज्ञांमध्ये योगदान देऊ शकतात.
क्रिकेट हा भारतात एक धर्मच समजला जातो आणि जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा प्रत्येक भारतीय अत्यंत पॅशनेट आणि भावनिक होतो. क्रिकेट चाहत्यांचे या ‘मेन इन ब्ल्यू’वर मानपासून प्रेम आहे आणि क्रिकेट विश्वचषकाच्या कालावधीत भारतात देशप्रेमाची एक लाटच आलेली असते, असंख्य जण प्रार्थना करत असतात, सगळ्यांनाच भारतीय संघाच्या जिंकण्याची आशा असते आणि सगळीकडेच सकारात्मकता भरून राहिलेली असते. ऑनलाइन पुजा सेगमेंट, पुजेशी संबंधित उत्पादने, टेम्पल बुकिंग्ज या क्षेत्राचे प्रवर्तक असलेल्या ‘माय ओमनमो’ या आध्यात्मिक स्टार्टअपचा सामाजिक विभाग असलेल्या चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशन या मुंबईतील एनजीओतर्फे या क्रिकेट हंगामात अध्यात्मिक कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत महायज्ञ करण्यात आला. या माध्यमातून टीम इंडियासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजल्या जाणाऱ्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये महायज्ञ करत या उपक्रमाचा आरंभ करण्यात झाला.


या संदर्भात त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित फेडरेशनचे ट्रस्टी सदानंद टोके म्हणाले, “आपण मन्युसूक्ताचे अधिष्ठापन केले आहे. या मंगल कार्याची सुरुवात गणेश पुजनाने झाली. त्यानंतर मातृका पूजन केले. मग आपण मन्यूदेवतेला आवाहन करून त्यांची १२४ आवर्तने केली. त्यानंतर अधिष्ठापन केले. मग नवग्रहशांती, रुद्र, हवन व बलिप्रदान आणि पूर्णाहुती दिल्या. त्यात ६ पुरोहितांनी १२४ आवर्तने केली आणि त्यानंतर तत् दशांश हवन यज्ञ, अशा प्रकारे हा विधी पार पडला.
या वर्ल्ड कपमधील सामन्यांच्या दिवशी चेन्नई, तिरुपती, श्रीपेरांबदूर, पुणे, वेल्लूर, सिंधुदुर्ग, हैदराबाद, औरंगाबाद अशा एकूण १०१ ठिकाणी आणि तीर्थस्थळे, मंदिरे, सार्वजनिक सभागृहे आणि देशभरातील वेदिक पाठशाळांमध्ये महायज्ञ आयोजित करण्यात येणार आहे.
माय ओमनमो आणि चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशनचे (सीआयएसएफ) संस्थापक मकरंद पाटील म्हणाले, “कोणत्याही शुभ प्रसंगी अनेक भारतीय हवन करतात. त्यामुळे आम्ही सुद्धा क्रिकेट आणि अध्यात्मक यांचा संयोग घडवून देशातील १०१ ठिकाणी विजयी भव महायज्ञ करण्याचे ठरविले. आपल्या मेन इन ब्ल्यूसाठी एक अब्ज भारतीयांना प्रार्थना करण्यासाठी एकत्र आणू शकू, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या वेबसाइटच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या भारतभर चालणाऱ्या हवन कॅम्पेनमध्ये देणगी देऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. या कॅम्पेनच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा अनेक एनजीओंना दान करण्यात येईल. आम्ही या वर्षी ही भावना देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवत आहोत. कारण क्रिकेट चाहते नाशिक, मुंबई, हैदराबाद आणि अशा अनेक ठिकाणांहून टीम इंडियाला प्रोत्साहन देऊ शकतात.”
चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशनच्या (सीएसआयएफ) मोहिमेची सुरुवात ‘विजयी भव’ या विजयगीताने अलीकडेच झाली. या गाण्यात ‘वीर मराठी’मधील (सेलेब्रिटी क्रिकेट टीम) हार्दिक जोशी, ऋतुराज फडके, संदीप जुवाटकर, आनंद काळे, माधव देवचाके, नरेश मारू हे सेलेब्रिटी क्रिकेटपटू सहभागी झाले आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कप्तान श्री. विक्रांत किणी हेसुद्धा या गाण्यात सहभागी झाले आहेत. एका प्रेरणादायक संदेशाच्या माध्यमातून भजनसम्राट अनुप जलोटा यांनी या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते, भारत वि. पाकिस्तान सामना आणि टी२० क्रिकेट वर्ल्डकप व महत्त्वाच्या चॅम्पियनशिपमधील महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘हवन’ करताना दिसून आले आहेत. क्रिकेट सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी म्हणून भारतीय क्रिकेट चाहते हवन करतात आणि सर्व भारतीय खेळाडूंसाठी देवाचा आशीर्वाद घेतात, असे दर वर्षी दिसून येते. ‘मायओमनमो’ हीच भावना #VijayiBhavIndia देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात या वर्षी घेऊन जात आहे.”, अशी पुष्टी मकरंद पाटील यांनी जोडली.

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News