माय स्कूल (इनोवेरा प्रि-स्कूल)ची नाशिकमध्ये फ्रँचायझी घेण्‍याची संधी !

Mar 18, 2023

पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे – विनय जोशी

नाशिक– मेंदूचा विकास हा वयाच्या पाच वर्षापर्यंत 80 ते 90 टक्के होतो. ही विकासाची वर्ष मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. लहान मुलांचा मेंदू हा स्पंज सारखा असतो. या वयात ते जे काही बघतात ऐकतात किंवा अनुभवतात ते सगळे त्यांच्या मेंदूत समाविष्ट होते म्हणूनच या वयात मुलांनी चांगल्या गोष्टी शिकणं, ऐकणं आणि बघणं खूप महत्त्वाचं ठरतं.
यासाठीच आम्ही मूल्य शिक्षणावर भर दिला आहे. पूर्व प्राथमिक वयात जर मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं गेलं तर मुलं त्या दृष्टीने तयार होतील आणि आपली संस्कृती जपण्यात याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन इनोवेरा स्कूल चे सहसंस्थापक विनय जोशी यांनी केले . या प्रसंगी संचालक विकास जकुने व शैक्षणिक समन्वयक प्राजक्ता पवार या उपस्थित होत्या .

माय स्कूल ची पहिली शाखा (इनोवेरा प्रि-स्कूल) लवकरच नाशिक शहरात सुरू होत असून त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले की या वयात मुलांना अनुभवातून शिकवलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. Innovera स्कूल हे शिक्षण क्षेत्रात मूल्यांवर आधारित शिक्षण देते. या संस्थेमध्ये लहान मुलांच्या अभ्यासक्रमावर संशोधन करून मुलांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या जातात.
संस्थेकडे शिक्षण क्षेत्रातला बारा वर्षांपेक्षा अधिक अनुभव असून या अनुभवातून आणि संशोधनातून मल्टिपल इंटेलिजन्स या संकल्पनेचा विचार केला. यावर आधारित आम्ही आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्तांवर मुलाचे निरीक्षण करण्यासाठी 280 वेगवेगळे निकष शोधले जे हार्वर्ड गार्डनर च्या सिद्धांतावर आधारित आहेत त्यानुसार जर शिकवले गेले तर मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण मिळेल आणि शिक्षणाची गोडी लागेल.असेही त्यांनी नमूद केले .
जेव्हा मूल त्याच्या पद्धतीने शिकेल तेव्हा ते जास्त वेळासाठी त्याच्या लक्षात राहील. आम्ही जेव्हा ही पद्धती अवलंबिली तेव्हा आम्हाला मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल दिसले.
जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये अमलात आली तेव्हा त्यानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं त्याचे मूळ उद्दिष्ट हे मुलांना अनुभवातून शिक्षण देणे हे आहे, आणि हेच आम्ही मल्टिपल इंटेलिजन्स नुसार करत आहोत. ही शिक्षण पद्धती पुण्याबाहेरच्या मुलांना पण फायद्याचे ठरावी या दृष्टीने आम्ही नाशिकमध्ये ती आणायचा विचार केला.
पहिल्या टप्प्यामध्ये सात शाखा नाशिक मध्ये सुरू करायचे उद्दिष्ट असून यामुळे नाशिक मधील महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील तसेच मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि मुलं त्यांच्या आवडीनुसार शिकून अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतील.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News