क्रेडाई तर्फे बांधकाम मजुरांसाठी कृतज्ञता सप्ताह ; १ मे ते ७ मे दरम्यान राज्यभर आयोजन

May 1, 2023

नाशिक : बांधकाम मजुरांप्रती असणारा आदर कृतीतून व्यक्त करण्याच्या विधायक भावनेतून क्रेडाई तर्फे ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ मे ते ७ मे दरम्यान हा सप्ताह राज्यभर साजरा केला जाणार असून यासाठी विविध सामाजिक उपक्रमांची आखणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली . क्रेडाई महाराष्ट्र तर्फे या उपक्रमाचे राज्यात विविध ६६ शहरात आयोजन करण्यात येणार आहे .
क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या बाबत अधिक माहिती देताना कृणाल पाटील म्हणाले की, बांधकाम मजूर म्हणजे बांधकाम क्षेत्राचा पाया. एकूणच बांधकाम क्षेत्राच्या विकासात्मक वाटचालीत बांधकाम मजुरांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ही जबाबदारी नसून आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच येत्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. क्रेडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले की या उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहर संघटनांना पुरस्कार तसेच ‘बांधकाम कामगारांसाठी सर्वोत्कृष्ट काळजी घेणारे विकसक’ यासाठी एक विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे
उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या सप्ताहासाठी एकूण ८ उपक्रमांची आखणी संस्थेतर्फे करण्यात आली असून त्यापैकी कमीत कमी ३ उपक्रम राबवून क्रेडाई शहर संघटना या उपक्रमात
सहभागी होऊ शकतात.

*यासाठी योजलेले उपक्रम पुढीलप्रमाणे,*
१.नोंदणी अभियान -कामगार कल्याण कार्यालयात मजुरांची नोंदणी करून घेणे. ज्यामुळे मजुरांना भविष्यात विमा, माध्यान्ह भोजन, टूल किट, आर्थिक सहाय्य, मुलांचे शिक्षण, गृहनिर्माण कर्ज/अनुदान आदी योजनांचा लाभ घेता येईल.
२.आरोग्य तपासणी शिबीर- कामगारांसाठी मोफत मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, रक्त तपासण्या. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य, नेत्र आणि दंत तपासणी आदी आरोग्य तपासणी शिबीर घेणे.
३. ज्ञान सत्र: या माध्यमातून सर्व कामगारांना वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी याविषयी माहिती देणे.
४. सुरक्षिततेचे उपाय -बांधकाम प्रकल्पावर वापरल्या जाणार्‍या सुरक्षा उपायांचे (पीपीई) महत्त्व सांगणे.
५. कौशल्य विकास- मजुरांसाठी क्रेडाई कुशलच्या सहकार्यातून “कौशल्य विकास कार्यक्रम’ घेणे.
६. रक्तदान शिबीर- कामगारांसाठी प्रकल्पाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे.
७. कामगार कल्याण योजना -प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, जीवन ज्योती विमा योजना इत्यादी कामगार कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांना देण्यासाठी विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करणे.
८.शिष्यवृत्ती – होतकरू मजुरांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घोषित करणे.

क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे स्किल डेव्हलपमेंट साठी नियमित उपक्रम राबविण्यात येतात. या मजूर कृतज्ञता सप्ताहात संपूर्ण शहरात विविध कार्यक्रम राबविणार असून मजूर नोंदणीचा कार्यक्रम रोज वेगवेगळ्या साइटवर करण्याचा मानस आहे .तसेच लेबर स्किलिंगचे प्रशिक्षण साइटवर देण्यात येऊन मेडिकल हेल्थ चेकअप वेगवेगळ्या साइटवर घेण्यात येणार आहे या च सोबत कामगारांचे समुपदेशन व नॉलेज सेशन
घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेण्याच्या दृष्टीने रक्तदानासारखे उपक्रमही राबविण्याचा मानस असल्याचे क्रेडाई महाराष्ट्र राज्य लेबर वेल्फेअर आणि लेबर , स्किलिंग समिती सहसन्मयक नरेंद्र कुलकर्णी यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी क्रेडाई राष्ट्रीय च्या सल्लागार समिती ( घटना ) चे प्रमुख जितुभाई ठक्कर , माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांचे नेहमीच मार्गदर्शन असून कुशल आणि समाधानी कामगार हा बांधकामाच्या दर्जा मधील महत्वाचा घटक असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर यांनी नमूद केले.
सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहसचिव अनिल आहेर मॅनेजिंग कमिटी मेंबर सतीश मोरे, विजय चव्हाणके, ऋषिकेश कोते, सुशील बागड, मनोज खिवसरा व सर्व कमिटी मेंबर प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News