नाशिक : आयसीआयसीआय बँकेने नाशिक शहरातील उत्तम नगर येथे नवी शाखा सुरू केली आहे. ही बँकेची या शहरातील १९ वी शाखा आहे. अंबड लिंक रस्ता येथे वसलेल्या या शाखेत एटीएम कम कॅश रिसायकलर मशिन (सीआरएम) बसवण्यात आले असून त्यामुळे ग्राहकांना पैसे भरणे तसेच काढण्याची सेवा मिळणार आहे. हे मशिन पूर्ण वेळ सुरू असेल.
नाशिक महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त आणि विभागीय अधिकारी डॉ. मयुर जी. पाटील यांनी या शाखेचे उद्घाटन केले. या शाखेद्वारे विविध प्रकारची खाती, ठेवी आणि कर्ज, बचत व करंट खाती, निश्चित आणि आवर्त ठेवी, व्यावसायिक कर्ज, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, परकीय विनिमय सेवा तसेच कार्ड सेवा दिली जाणार आहे. ही शाखा सोमवार ते शुक्रवार आणि पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी सुरू राहील. बँकेच्या नेटवर्कमध्ये महाराष्ट्रातील ७०० शाखा व १३०० एटीएम्सचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेद्वारे शाखांचे मल्टी- चॅनेल डिलीव्हरी नेटवर्क, एटीएम्स, कॉल सेंटर्स, इंटरनेट बँकिंग (www.icicibank.com) आणि मोबाइल बँकिंगच्या मदतीने आपल्या विस्तृत ग्राहकवर्गाला सेवा दिली जाते.



