‘आंगन – अपनों का’ मालिकेत नीता शेट्टी साकारणार कर्तबगार अन् महत्त्वाकांक्षी मोठ्या बहिणीची भूमिका

Nov 7, 2023

नाशिक : सोनी सबवरील आगामी मालिका ‘आंगन – अपनों का’मध्ये कौटुंबिक नाट्य पाहायला मिळणार आहे. यात महेश ठाकूर हे तीन कन्या दीपिका (नीता शेट्टी), तन्वी (अदिती राठोड) आणि पल्लवी (आयुषी खुराना) यांच्या प्रेमळ पित्याची भूमिका साकारत आहेत. हे समकालीन कौटुंबिक नाट्य परिवारातील सर्वात धाकटी मुलगी पल्लवीची हळवी कथा उलगडून दाखवते. तिला वडील जयदेव यांच्याबाबतचे प्रेम अन् जबाबदाऱ्यांप्रती कसलीही तडजोड करायची नाही.

कुटुंबातील सर्वात थोरल्या मुलीच्या भूमिकेत प्रतिभावंत अभिनेत्री नीता शेट्टी झळकत आहे. कुटुंबात सर्वात मोठी मुलगी असल्यामुळे दीपिका आपल्या परिवारासाठी पाठबळाचा स्रोत आहे. आईचे निधन झाल्यानंतर तिनेच बहिणींचा अन् घराचा सांभाळ करण्यात वडिलांची मोठी मदत केली आहे. व्यवसायाने एअर होस्टेस असलेली दीपिका ही खूप महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी आहे. यासोबतच ती आपल्या वैवाहिक आयुष्यात ताळमेळ बसवण्याचाही प्रयत्न करत आहे.

दीपिका शर्माची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री नीता शेट्टी म्हणाली की, ” खरं तर दीपिका ही टिपिकल मोठ्या ताईसारखी आहे. ती थोड्या प्रमाणात आपली अधिकारवाणी गाजवते, पण कोमल हृदय अन् चांगल्या हेतूनेच! मी ही भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक होते. कारण वडिलांवरील ओझे कमी करण्याची आणि आयुष्यात यशस्वी होण्याच्या दृढनिश्चयाशी मी स्वत:ला जोडून पाहते. या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. अशी भूमिका निभावणे हे खरोखरीच स्वत:ला समृद्ध करण्यासारखे आहे. तिच्या व्यक्तिरेखेसोबत आपुलकी साधून प्रेक्षकांना या मालिकेचा अनुभव करून देण्यासाठी मी प्रचंड उत्सुक झालेले आहे.”

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News