‘वागले की दुनिया’ मालिकेत जर्मनीवरून आलेला विद्यार्थी करेन आयुष्यात आणतो नवा दृष्टिकोन

Nov 24, 2023

Nashik : सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नई पिढी, नये किस्से’ ही हृदयस्पर्शी मालिका मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात डोकावून पाहते. यात त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील आव्हानांचे कथानक ती प्रेक्षकांसमोर मांडते. मालिकेच्या अलीकडील भागांत वागले कुटुंबाला चांगलाच झटका बसतो, जेव्हा त्यांना कळते की आपल्या घरातील नवा पाहुणा परदेशी विद्यार्थी करेन ही मुलगी नव्हे तर चक्क मुलगा आहे!

मालिकेतील आगामी भागात वागले कुटुंबाला या बद्दलचे रहस्योद्घाटन होते. भारतीय संस्कृती आणि जीवनाप्रती त्याचा आगळावेगळा दृष्टिकोन त्यांना समजतो. यामुळे वागले परिवारात एकच खळबळ उडते. फक्त परीक्षांपुरता अभ्यास करण्याच्या पारंपरिक कल्पनेविरुद्धच्या करेनच्या अपारंपारिक कल्पनांत जेव्हा द्वंद्व निर्माण होते तेव्हा अथर्वच्या (शाहीन कपाही) मनात द्विधा स्थिती उद्भवते. दरम्यान, जेव्हा करेनचे सखीसोबत (चिन्मयी सालवी) निरलस बंध जुळतात तेव्हा विवानच्या (नमित शहा) मनात असूयेची भावना निर्माण होते. वागले कुटुंब जसजसे करेनसोबत राहत जाते, तसतसा हा परदेशी विद्यार्थी त्यांच्या आयुष्याला कशा प्रकारे कलाटणी देते, हे पाहणे अधिकच रोचक होते.

मालिकेत राजेश वागलेची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत राघवन म्हणाला की, “करेनच्या आगमनामुळे मालिकेत अधिकच गंमत आली असून रोचक कलाटणीही मिळाली आहे. सखीसोबत करेनच्या जवळिकीमुळे एक टिपिकल वडील म्हणून राजेश पुरता हादरून गेला आहे. करेन हा वागले कुटुंबापेक्षा अत्यंत वेगळा विचार करत असतो. त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. मालिकेतील आगामी भाग कथानकाला वेगळी अन् ताजी कलाटणी देणारे असतील. करेन आणि त्यांच्या विचारांवर प्रेक्षक कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.”
मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9:00 वाजता, फक्त सोनी सबवर

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News