नाशिक : या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्स एक्स्पर्ट मर्झी पेस्तनजी उपस्थित असणार आहे. विशेष अतिथी म्हणून तो स्पर्धकांना मोलाचा सल्ला तर देईलच, पण त्याचबरोबर ‘तीन का तडका’ हे थीम देऊन स्पर्धकांना एक आगळेवेगळे आव्हान देखील देईल. प्रत्येक स्पर्धक त्याचा कोरिओग्राफर आणि
मनोरंजन व्यवसायातील एक अतिथी कोरिओग्राफर यांच्या सोबत टीम बनवून परफॉर्म करेल आणि प्रेक्षक व परीक्षक यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री करुणा पांडे आपला कोरिओग्राफर विवेक चचेरे आणि सेलिब्रिटी कोरिओग्राफर आशीष पाटील यांच्यासमवेत ‘ताल से ताल’ गाण्यावर असा काही डौलदार परफॉर्मन्स देईल की सगळे मंत्रमुग्ध होऊन जातील! त्यात, हे तिघे याच गाण्याच्या चालीवर एक लावणी देखील प्रस्तुत करून मंच दणाणून सोडतील. हा फ्यूजन अॅक्ट पाहून प्रभावित झालेला मर्झी म्हणाला, “आशीष, तू सुरुवातीला जी टाळी वाजवलीस, ती संगीतात मिसळून गेली. तुमच्या परफॉरमन्सने हा मंच खरोखर दणाणून उठला. हे साध्य करण्यासाठी खूप ताकद लागते. विवेक, मी तुला यापूर्वी असे करताना कधीच पाहिले नाही. म्हणजे, ते दोघे (करुणा आणि आशीष) इतके मस्त परफॉर्म करत होते, की मला वाटले, त्यांच्याशी ताळमेळ राखण्यासाठी तू देखील आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स दिलास. अप्रतिम! तू जे केलेस त्याचे मला कौतुक वाटते. तू त्यांच्याशी ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करत होतास आणि ते तू उत्तम केलेस. करुणा, तुला मी काय सांगू? तू एक खूप चांगली डान्सर आहेस, अगदी शास्त्रीय नृत्यात देखील. तू भावना उत्तम जाणत असल्याने तुझी अभिव्यक्ति आणि टायमिंग उत्कृष्ट असते. तुझी सिग्नेचर स्टेप तर तू अफलातून केलीस. तुझी लावणी, तुझे टायमिंग आणि सुरुवातीला केलेला सेमी-क्लासिकल डान्स सुंदर होता. शिवाय, हे गाणे पण मला फार आवडते, कारण मी या गाण्याचा भाग होतो. हे गाणे चित्रित करताना आम्ही खूप मजा केली होती. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा आम्ही पार्श्वभूमीत डान्स करायचो, तेव्हा आम्ही खूप धमाल करायचो, कारण त्यावेळी आमच्याकडे कुणीच बघायचे नाहीत. आणि आम्ही आम्हाला हवे तसे नाचायचो. मी मलाइकाच्या मागे देखील डान्स केला आहे.”
त्याला पुस्ती जोडत मलाइका अरोरा म्हणाली, “मला वाटते तुम्ही ‘ताल से ताल’ खूप छान मिळवलात. आशीषदादा, या मंचावर तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. तू ज्या पद्धतीने लावणी करतोस, तशी कुणीच करत नाही. तू तर लावणीचा राजा आहेस. खरोखर हा मुकुट तू आपल्या मस्तकी धारण केला पाहिजे. ती तुझी योग्यता आहे. तू अद्भुत आहेस. तुझा डान्स म्हणजे ओघवती कविता जणू! तुझ्या डान्समधला नेमकेपणा हृदयाला आनंद देऊन जातो. खरोखर! आणि हे सगळ्यांचेच मत आहे. सर्वजण हेच म्हणतील की, जेव्हा आशीष पाटील दादा मंचावर येतो, तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. खरं सांगायचं तर या त्रिकूटाला पाहून मी खूप रोमांचित झाले होते, कारण मला माहीत होते की काहीतरी आगळेवेगळे असणार. मला लावणी खूप आवडते. घुंगरू आणि तबल्याचा ठेका यांच्या एकत्रित परिणाम खूप छान होता. तू तबल्याच्या ठेक्यावर डान्स करत होतास आणि विवेक, तू घुंगरूंसोबत डान्स करत होतास. ते खूप छान दिसत होते. मस्तच. उत्तम कोरिओग्राफी. करुणा, तुझा चेहरा ऊर्जेने झळकतो आहे. तुझे हावभाव विशेषतः लावणीतील तुझे हावभाव अप्रतिम होते. ती सर्वात महत्त्वाची बाब आहे. शिवाय तुझे पदलालित्य, हातांच्या हालचाली, तुझी अभिव्यक्ति फार सुंदर दिसत होती. अप्रतिम! मला वाटते, फराह मॅमने देखील गेल्या वेळेस सांगितले की, तू जेव्हा परफॉर्म करतेस तेव्हा तू इथल्या तरुण कलाकारांशी स्पर्धा करतेस. तू अक्षरशः एकही बीट चुकू दिला नाहीस. प्रत्येक क्षण तू टिपलास! ते जबरदस्त होते. तुम्हा तिघांना पाहून मला खूपच आनंद झाला आहे.”
करुणासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना आशीष म्हणतो, “यावेळी, जेव्हा मला समजले की, मला करुणा जींसोबत काम करायचे आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण मी त्यांचे अनेक परफॉर्मन्स पाहिले आहेत, कारण मी बऱ्याचदा विवेक जींची कोरिओग्राफी फॉलो करतो. तो माझ्या आवडत्या कोरिओग्राफर्सपैकी एक आहे. आणि जेव्हा मला हे समजले की, करुणा जी माझ्याबरोबर डान्स करणार आहेत, तेव्हा मी हे ठरवून टाकले की आपण लावणीच करायची, कारण तिने अद्याप लावणी सादर केलेली नाही. आत्तापर्यंत या मंचावर तिची अभिव्यक्ती आणि हावभाव यांची फक्त चर्चाच झाली आहे. ती त्यासाठी जी मेहनत घेते ती खरोखर कौतुकास्पद आहे.” यानंतर आशीष करुणाला ‘मानाचा मुजरा’ करताना दिसेल.
‘झलक दिखला जा’ मधले चमकदार परफॉर्मन्स अवश्य बघा, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!






