नाशिक : या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स रियालिटी शोमध्ये ‘एक और एक ग्यारह’ थीम असणार आहे, आणि या 11 व्या आठवड्यात सगळे स्पर्धक आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सरसावले आहेत. अंतिम फेरीसाठीची चढाओढ सुरू झाली आहे आणि प्रत्येक स्पर्धक आपले डान्सचे कौशल्य प्रकट करण्यासाठी तयार झाला आहे. या स्पर्धकांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या भागात त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शोमध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रिन्स नरूला, के-पॉप आयडॉल ‘अऊरा’, मि. फैसू, सुमेध शिंदे, बाबिल खान, जसलीन रॉयल आणि इतरांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे हा भाग तारांकित होणार आहे.
अभिनेता प्रिन्स नरूलाचे शिव ठाकरेशी खास नाते आहे. आणि आपला दोस्त शिवचा उत्साह वाढवण्यासाठी तो या शोमध्ये येणार आहे. या भागात शिव आपली कोरिओग्राफर रोमशा सिंह हिच्यासह ‘जय श्री राम’ गाण्यावर दमदार आणि उद्बोधक डान्स सादर करणार आहे. या परफॉर्मन्समध्ये रामायण या कालातीत कथेचे आगळ्या पद्धतीने अर्थघटन करून हे दोघे डान्सर सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील.
प्रभावित झालेली मलाइका आरोरा म्हणाली, “मला हा अॅक्ट खूप आवडला. त्यात अनेक अद्भुत क्षण होते. शिव, हा खरोखर तुझा सगळ्यात दमदार परफॉर्मन्स होता. त्यात खूप सफाई होती. मला हा परफॉर्मन्स खूप आवडला.”
आपल्या दोस्ताला, शिवला प्रोत्साहन देण्यासाठी खास आलेल्या प्रिन्स नरुलाने सांगितले, “आमचा प्रवास बराचसा एकसारखा आहे. तो एका लहान गावातून आला आहे आणि मी सुद्धा एका खेड्यातून आलो आहे. आपली निवड होईल की नाही ही चिंता मनात बाळगत इथे रांगेत उभे राहणे फार कठीण आहे. मी जितके शो केले आहेत, तितकेच शिवने देखील केले आहेत. जेव्हा मी परीक्षक बनलो, आणि गेल्या वेळी त्याच ठिकाणी जेव्हा शिव सुद्धा परीक्षक म्हणून आला, तेव्हा मला फार आनंद झाला. कारण त्याचे मोल मी जाणतो. कारण, आम्ही दोघांनी खूप कठोर परिश्रम केले आहेत. शिव, आम्ही सगळे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो, आणि आम्हाला तुझा अभिमान आहे. या शोमधला शिवचा प्रवास मी फॉलो करत आहे. तो अष्टपैलू आहे आणि या शो मध्ये त्याने वेगवेगळ्या शैली आजमावून पाहिल्या आहेत.”
‘दही साखर’ देण्याच्या रीतीमध्ये बदल करत प्रिन्स शिवसाठी ‘तरी वाले पोहे’ आणून त्याला शुभेच्छा देताना दिसेल!

‘झलक दिखला जा’ मध्ये चमकदार परफॉर्मन्स बघायला विसरू नका, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!






