इंडियन आयडॉल 14 मध्ये हृतिक रोशनने पियुष पंवारमध्ये केले गजब परिवर्तन!

Jan 19, 2024

नाशिक : या रविवारी, ‘फाइट टू टॉप 10’ थीम असलेल्या भागात खुद्द अभिनेता हृतिक रोशन हजर असणार आहे. या शोमध्ये हृतिकचे मनःपूर्वक स्वागत करताना परीक्षक विशाल दादलानी आणि स्पर्धकांनी एकत्र मिळून हृतिकच्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘फायटर’ या आगामी चित्रपटातील ‘सुजलाम् सुफलाम्’ हे गाणे सादर केले. या भागात निवड झालेल्या टॉप 10 स्पर्धकांवर प्रकाश झोत असेल आणि हे स्पर्धक ‘इंडियन आयडॉल’ चा किताब मिळवण्यासाठी यापुढील सुरेल वाटचाल चालू ठेवतील.”

राजस्थानच्या पियुष पंवारने ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाचे शीर्षक गीत आणि ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘यू आर सोणियो’ ही गीते सादर करून सगळ्यांना प्रभावित केले. आपल्या अद्वितीय शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हृतिकने पियुष पंवारच्या मागील परफॉर्मन्सेसचे कौतुक करत पियुषचा लुक बदलून टाकण्याची आपली इच्छा व्यक्त केली. सगळ्यांची उत्कंठा वाढलेली असताना पियुष सगळ्यांसमोर आला आणि त्याच्यातील बदल पाहून सर्व जण थक्क होऊन गेले. आपल्याला मिळालेल्या प्रशंसेचा विनम्रतेने स्वीकार करून पियुषने त्याच्यातील लक्षणीय बदलाबद्दल हृतिकचे आभार मानले.

पियुषवर कौतुकाचा वर्षाव करत हृतिक म्हणाला, “भारत आधीच त्या जुन्या पियुषचा चाहता बनला आहे. पण आता समस्त जग त्याच्या या नव्या रुपावर मोहित होण्यासाठी सज्ज आहे.” विशाल दादलानी आणि श्रेया घोषालने देखील अशाच स्वरूपाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पियुषच्या नवीन रुपाचे आणि अप्रतिम परफॉर्मन्सचे कौतुक केले.

पियुषने हृतिकला ‘कहो ना प्यार है’ या प्रसिद्ध गाण्यावर आपल्यासोबत परफॉर्म करण्याचा आग्रह केला, तो या भागाचा मोठा हायलाइट होता. त्याच्या विनंतीला मान देऊन हृतिक इतर परीक्षकांसह मंचावर आला, त्याने पियुषची इच्छा पूर्ण केली व स्पर्धक तसेच प्रेक्षकांसाठी तो एक जादुई आणि अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.”

अधिक जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल सीझन 14 या रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News