Nashik : या रविवारी, चंकी पांडेच्या उपस्थितीत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. आपल्या माकड चेष्टांनी या शोमधले कसलेले कलाकार सगळ्यांना खळखळून हसवतील. कुशल बद्रिके, गौरव दूबे आणि कावेरी प्रियम एक मस्त स्केच सादर करतील, ज्यात कुशल बद्रिके चंकी पांडेने उभी केलेली ‘आखरी पास्ता’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. यात तो एक कुक बनला आहे, जो किचनमधल्या गोष्टींना एक मसालेदार वळण देताना दिसेल! त्याचा हा अॅक्ट पाहून चंकी पांडे आणि ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशी त्याला स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसतील.
आपल्या या आगामी गॅगविषयी बोलताना तूफान परफॉर्मर कुशल बद्रिके म्हणतो, “आखरी पास्ताची नक्कल करताना मी मनातून घाबरलो होतो कारण प्रत्यक्ष आखरी पास्ताच्या समोर मला ती नक्कल करायची होती. पण मला आनंद वाटतो, की चंकी पांडे जींना मी उभी केलेली त्यांची ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा आवडली! गौरव दूबे आणि कावेरी प्रियम सोबत काम करायला मजा आली. ते फार हुशार विनोदवीर आहेत. मंचावरच्या आमच्या केमिस्ट्रीमुळे गॅगची रंगत आणखी वाढली.” अवश्य बघा, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’, या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!






