इंडकल टेक्नॉलॉजीज भारतात एसर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स आणणार

Jul 17, 2024

नाशिक – इंडकल टेक्नॉलॉजीज या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने आज आपल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अद्वितीय उत्पादनांसाठी ओळखल्या गेलेल्या जागतिक ख्यातीच्या एसर इन्कॉर्पोरेटेडसोबत ट्रेडमार्क लायसन्सिंग करारनाम्याअंतर्गत स्मार्टफोन बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. या करारनाम्यानुसार इंडकल भारतात एसर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स डिझाइन, उत्पादन आणि वितरण करेल. ही धोरणात्मक भागीदारी भारतीय बाजारपेठेत एसर ब्रँडेड स्मार्टफोन आणणार असून नावीन्यपूर्णता व विस्ताराचे एक नवीन युगही आणणार आहे.

इंडकल टेक्नॉलॉजीज २०२४च्या मध्यावर एसर ब्रँडअंतर्गत विविध प्रकारचे स्मार्टफोन मॉडेल्स आणणार आहे आणि वेगाने व्याप्ती तसेच बाजारातील वाटाही वाढवेल. हे प्रयत्न एसर ब्रँडची शक्ती आणि इंडकलची भारतीय ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देण्याची वचनबद्धता अधोरेखित करतात आणि त्यात नावीन्यपूर्ण तपशील, अद्ययावत हार्डवेअर व नवीन सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.
इंडकल टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद दुबे यांनी आपला आनंद व्यक्त केला, “एसर स्मार्टफोन्सवर आम्ही मागच्या काही वर्षांपासून काम करत आहोत आणि आमच्या प्रवेशाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. एसर स्मार्टफोन्ससोबत आम्हाला खात्री वाटते की, भारतीय ग्राहकांना चांगला फायदा मिळेल. आमच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्रोसेसर्स, उत्तम दर्जाचे कॅमेरा तंत्रज्ञान आणि या श्रेणीमध्ये विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांसोबत चांगल्या पद्धतीने डिझाइन केलेल्या स्मार्टफोन्सचा अनुभव मिळेल. याचा सर्वोत्तम भाग म्हणजे एसर ब्रँडचे सर्व स्मार्टफोन्स भारतात डिझाइन करून तयार केले जातील. ही देखील इंडकलसाठी एक उत्तम कामगिरी आहे”.

एसर इन्कॉर्पोरेटेडचे ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्सचे उपाध्यक्ष जेड झोऊ म्हणाले की, “एसर ब्रँडने १९८७ साली स्थापना झाल्यापासून कायमच लोक आणि तंत्रज्ञान यांच्यामधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इंडकल टेक्नॉलॉजीज ही मोहीम एसर ब्रँडअंतर्गत विविध प्रकारचे स्मार्टफोन्स देऊन पुढे नेईल आणि त्यामुळे वापरकर्त्यांना नवनवीन पर्याय उपलब्ध होतील. तसेच भारतीय बाजारपेठेतील त्यांचा अनुभवही वाढीस लागेल.”
या उद्यमाद्वारे एक मोठा संगणक ब्रँड स्मार्टफोनच्या बाजारपेठेत येत असून या क्षेत्राच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेला अधोरेखित करणारा आहे. या स्मार्टफोन्सची किंमत १५,००० ते ५०,००० रूपयांच्या घरात असून त्यामुळे आता या बाजारपेठेत मोठी स्पर्धा पाहायला मिळेल.
एसर ब्रँडेड स्मार्टफोन्सचे उत्पादन भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमानुसार भारतात केले जाईल. हे फोन इ-वाणिज्य प्लॅटफॉर्म्स आणि देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्येही खरेदीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना ते सहजपणे उपलब्ध होतील.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News