कोटक म्युच्युअल फंडाची एसआयपी ठरते प्रभावी ; नाशिक विभागाची २८ हजार कोटींची गुंतवणूक

Oct 4, 2024

नाशिक : कोटक म्युच्युअल फंड (केएमएफ) साठी हे आर्थिक वर्ष अतिशय उत्साहवर्धक राहिले आहे. कोटक म्युच्युअल फंडाच्या योजनांचे कार्यप्रदर्शन आणि उत्पादन केंद्रित धोरणामुळे वितरण साखळीत फंडाच्या पाऊलखुणा आणखी विस्तारण्यासाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरले आहे. कंपनीने विविध मालमत्ता वर्गांमध्ये व्यवस्थापनांतर्गतच्या मालमत्तेत अर्थात एयूएममध्ये आपली वृध्दी सुरूच ठेवली आहे. सध्या कोटक म्युच्युअल फंडाकडे 42 लाखांहून अधिक एसआयपी फोलिओ आहेत आणि त्याद्वारे गुंतवणूकदार नियमितपणे त्याच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये (KMAMC अंतर्गत संशोधन आणि CAMS) गुंतवणूक करतात. कोटक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये कोटक फ्लेक्सी कॅप फंड, कोटक ब्लूचिप फंड, कोटक इमर्जिंग इक्विटी फंड आणि कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड यासारखी उत्पादने लोकप्रिय आणि प्रचलित आहेत.

नाशिक विभागात 31 ऑगस्ट 2024 अखेर म्युच्यूअल फंड उद्योगाचा एकूण एयूएम 28000 कोटी रुपये च्या पुढे नोंदविला गेला असून नियमित एसआयपी खात्यांची संख्या सात लाख 98000 च्या पुढे सरकली आहे. ही संख्या म्युच्युअल फंड आणि नियमित गुंतवणूक योजनांची (एसआयपी) गुंतवणूकदारांमध्ये वाढती लोकप्रियता दर्शवते. (स्रोत: KMAMC अंतर्गत संशोधन आणि CAMS)एक प्रभावी गुंतवणूक साधन म्हणून एसआयपीचा कोटक म्युच्युअल फंड सक्रियपणे प्रचार करत आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची शिस्त कायम राखता येते तसेच नियमित गुंतवणूकीची योजना सुध्दा राबविता येत आहे. म्युच्युअल फंड योजनांची विस्तृत श्रेणी गुंतवणूकदारांना कंपनीतर्फे सादर करण्यात आलेली आहे.

कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे विक्री, वितरण आणि डिजीटल व्यवसाय विभागाचे राष्ट्रीय प्रमुख मनीष मेहता म्हणाले, “कोटक म्युच्यूअल फंड येथे आम्ही सक्रियपणे एसआयपीसाठी प्रचार करत आहोत आणि एसआयपीला गेल्या काही वर्षांपासून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अस्थिरतेच्या काळातही, विशेषतः बाजारातील चढउतार आणि अस्थिरता हाताळण्यासाठी एसआयपी नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूकदारांसाठी एक संतुलित प्रतिनिधी म्हणून काम करते. गुंतवणूकदार आमच्या सध्याच्या कोणत्याही योजनांमधून निवड करू शकतात आणि एसआयपी मार्गाने आपली गुंतवणूक सुरू करू शकतात. आमची म्युच्युअल फंड उत्पादने आणि सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीत गुंतवणुकदारांना सहज प्रवेश प्रदान करणे, हा आमचा उद्देश आहे.”

शाखा विस्ताराव्यतिरिक्त, कोटक म्युच्युअल फंडाने www.kotakmf.com या आपल्या वेबसाइटला नवीन रुप प्रदान केले आहे. त्यामुळे वितरक आणि ग्राहकांना पोर्टफोलिओ तपशील, तज्ञ ब्लॉग, व्हिडिओ आणि ऑनलाइन व्यवहार सुविधा सहजपणे उपलब्ध झालेली आहे. कोटक बिझनेस हब हे वितरकांसाठी एक समर्पित पोर्टल असून आमच्या भागीदारांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रयत्नांना अधिकाधिक पाठबळ देण्यासाठी ग्राहकांची माहिती, सह-ब्रँड विपणन सामग्री आणि विश्लेषणात्मक साधने वापरण्याची मुभा देते. तसेच, कोटक म्युच्युअल फंडाने सुरू केलेल्या प्रोस्टार्ट ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाला वितरक भागीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये आर्थिक नियोजन, फिक्सड इन्कम मार्केट (निश्चित उत्पन्न बाजार) आणि कोटक प्रोस्टार्ट या YouTube चॅनेलवर अन्य गुणात्मक विषय उपलब्ध आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News