Nashik : देशभरातील विविध भागांमध्ये द्राक्षशेतीची लागवड अनुकूल व्हावी याकरिता गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड हि प्रसिद्ध कंपनी द्राक्ष पिकांबाबत आपले शेतीतील विविध तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्याबाबत सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे. आता कंपनीच्यावतीने द्राक्षाचे उत्पादन आणि गुणवत्ता अधिक वाढण्यासाठी द्राक्ष पीक पॅकेज सादर करण्यात आले आहे. यात द्राक्ष उत्पादकांना लागवडीदरम्यान प्रत्येक टप्प्यावरील आवश्यक बाबींची माहिती पुरवली जाईल. द्राक्ष वेलीच्या छाटणीपासून ते मण्यांच्या विकासापर्यंत अत्याधुनिक बायोस्टुमिलंट्स आणि पी. जी. आर. चे पीक वेळापत्रक या पॅकेजमध्ये उपलब्ध केले आहे.
गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या कंबाईन या प्रसिद्ध उत्पादनामुळे द्राक्षाची लागवड करणा-या जवळपास १ लाख शेतकरी कुटुंबांना द्राक्ष शेतीत फायदा दरवर्षी झाला आहे. या कुटुंबीयांकडून दर वर्षाला सुमारे २.२५ लाख एकर जमिनीवर द्राक्षे पिकवली जातात. हे क्षेत्र देशातील द्राक्ष उत्पादन क्षेत्राच्या सुमारे ७५ टक्के क्षेत्र व्यापते. कंबाईनच्या योग्य वापराने द्राक्ष शेतकरी उत्तम गुणवत्ता असणारे द्राक्ष उत्पादन करू शकतात.
गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या क्रॉप प्रोटेक्शन बिसनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एन. के. राजवेलू म्हणाले, “ गोदरेज कंबाईन या उत्पादनामुळे द्राक्ष उत्पादकांना द्राक्षांची गुणवत्ता वाढवण्यास मदत झाली आहे. जगभरात आपला देश द्राक्ष लागवडीसाठी ओळखला जातो. द्राक्षाच्या वाढत्या मागणीमुळे द्राक्ष बागायतदारांसोबत देशाचीहि आर्थिक भरभराट झाली आहे. कंबाईन उत्पादनात द्राक्ष लागवडीसाठी आवश्यक होमोब्रासिनोलाइड (एचबीआर) या घटकाचे योग्य प्रमाण उपलब्ध आहे. अशाप्रकारच्या इतर उत्पादनांमध्ये बरेचदा होमोब्रासिनोलाइडचा वापर केला जात नाही. बरेचदा होमोब्रासिनोलाइड अत्यल्प प्रमाणात वापरले जाते आणि अश्या उत्पादनांचा द्राक्ष शेतीला फारसा उपयोग होत नाही. शेतक-यांच्या द्राक्षाचे वेगवेळ्या कीड व रोगांपासून संरक्षण व्हावे आणि द्राक्षाचे उत्पादन आणि गुणवत्ता उत्तम व्हावी म्हणून गोदरेज अग्रोवेट द्राक्ष पीक पॅकेज सादर करत आहोत.
गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या पी.जी.आर आणि बायो-स्टीम्युलंट विभागाचे प्रोडक्ट मॅनेजर, डॉ. संचित मंडपे यांनी कंपनीच्या द्राक्ष लागवड पॅकेजबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “ देशातील द्राक्ष शेती अधिक समृद्ध व्हावी म्हणून आम्ही तयार केलेले द्राक्ष पीक पॅकेज सर्वोत्तम असेल. नाशिकच्या द्राक्षांना युरोपातील बाजारात प्रचंड मागणी आहे आणि पॅकेजमधील दिलेल्या उत्पादनांच्या योग्य वापराने द्राक्षाचा आकार, चव, रंग आणि टिकाऊपणा उत्तम राखण्यास मदत होईल व त्याचबरोबर युरोपसारख्या इतर देशांत द्राक्षांची निर्यातही वाढेल.”
या द्राक्ष पीक पॅकेज मध्ये सुरुवातीला टेरा सोर्ब् जे जगातील वेगवान बायोस्टिम्युलंट असून, २ मिलीमीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरल्यास झाडावर एकसारख्या प्रमाणात घड येतात, पानांचा हिरवेगारपणा टिकतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमी भरून निघते. द्राक्षांच्या छाटणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी झाडांना आर्मूरॉक्स फवारले जाते. आर्मूरॉक्सच्या वापराने झाडांवर संरक्षणात्मक सिलिकॉन क्युटिकल्स तयार होते आणि या क्युटिकल्समुळे किटकनाशकांचा वापरही कमी होते तसेच थ्रिप्स आणि भुरी रोगापासून होणारे नुकसान कमी होते. द्राक्षाच्या विकासादरम्यान फळाची गुणवत्ता,आकार, लांबी, चव आणि रंग अबाधित राहावा म्हणून सुपर शक्ती किंवा डायमोर आणि इक्विलिब्रियम ही दोन उत्पादने एकमेकांत मिसळून द्राक्षांवर फवारले जातात. ३ ते ५ मिमी द्राक्ष मण्याच्या अवस्थेमध्ये हिरव्या आणि गोल द्राक्षांसाठी डायमोर (१ मिली / लिटर) आणि लांब आणि रंगीत द्राक्षांसाठी सुपर शक्ती कंबाइन (१ मिली / लिटर) वापरावे यामुळे द्राक्षाची मण्याची वाढ आणि योग्य आकार मिळण्यास मदत होते. ६ ते ८ मिमी द्राक्ष मण्याच्या अवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या द्राक्षांसाठी २ मिली प्रति लिटर पाण्यात सुपरशक्ती आणि इक्विलिब्रियम मिसळून पुन्हा फवारावे यामुळे द्राक्षाचा आकार आणि टिकाऊपणा वाढवण्यात मदत होईल. कंबाइन च्या योग्य वापराने नाशिकमधील द्राक्ष निर्यात, सांगलीतील द्राक्षांची गोडी आणि कर्नाटकातील मनुक्यांची गुणवत्ता वाढल्याचे दिसून आले आहे.
द्राक्षाच्या शेतीसाठी गोदरेज ऍग्रोव्हेटने सुरु केलेल्या नव्या पीक पॅकेजमधून भारतीय शेतक-यांना द्राक्ष शेतीच्या उत्पादनात वाढ करता यावी, द्राक्षांची गुणवत्ता सुधारावी परिणामी द्राक्षाची निर्यात वाढण्यास मदत व्हावी हा उद्देश आहे. देशातील द्राक्षांना जगभरातून मागणी वाढावी म्हणून गोदरेज ऍग्रोव्हेटने हे द्राक्ष पीक पॅकेज सादर केले आहे, जेणेकरुन द्राक्षाची निर्यात वाढून येणाऱ्या काही वर्षांत भारतीय द्राक्ष शेतीचे नाव जगात अव्वल स्थानावर राहील.




