मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

Aug 22, 2025

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या मेडिकल स्टोरच्या उद्घाटनाची घोषणा केली, ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे 3 वेळचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.झेनो हेल्थने केवळ काही आठवड्यांत चार नवीन मेडिकल स्टोर्स उघडले आहेत. आता त्यांच्या 5 व्या स्टोरचे उद्घाटन नाशिककरांना परवडणारी आणि उच्च दर्जाची ब्रँडेड व जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या झेनो हेल्थच्या ध्येयातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या नवीन लाँचसह, महाराष्ट्रात झेनो हेल्थची उपस्थिती 204 स्टोर्सपर्यंत वाढली आहे.हे नवीन मेडिकल स्टोर महाराणा प्रताप चौक रोड, प्रभात कॉलनी, सिडको येथे आहे.

श्री छगन भुजबळ म्हणाले,”परवडणारी आरोग्यसेवा हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. औषधांच्या वाढत्या किमती हे कुटुंबांवर, विशेषतः क्रॉनिक आजारांचे व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांवर, एक मोठा भार आहे. झेनो हेल्थ सारखा उपक्रम नाशिककरांना दिलासा देत आहेत कारण ते सही औषधे सही किंमतीत उपलब्ध करून देत आहेत. आपल्या शहरात, अशा उपक्रमांचा विस्तार होताना पाहून मला आनंद होत आहे.”

आयआयटी (IIT) बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी 2017 मध्ये झेनो हेल्थची स्थापना केली. कंपनीने आतापर्यंत 30 लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे, ब्रँडेड व जेनेरिक औषधांवर ₹1000 कोटींहून अधिक बचत करून दिली आहे. नाशिकमध्ये, कंपनी पुढील 12-18 महिन्यांत 30 नवीन स्टोर्स उघडण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे परवाना धारक फार्मासिस्ट आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी 100 हून अधिक स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

या लाँचबद्दल बोलताना, झेनो हेल्थचे सह-संस्थापक आणि सीईओ (CEO) सिद्धार्थ गाडिया म्हणाले: “हे उद्घाटन केवळ आणखी एक स्टोर जोडण्याबद्दल नाही, तर ते नाशिकमधील कुटुंबांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याबद्दल आहे. तरुण व्यावसायिकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत — प्रत्येक कुटुंबाला परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह औषधे घराजवळ उपलब्ध होतील याची खात्री आम्हाला करायची आहे. आमचे लक्ष विश्वास निर्माण करणे, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि सातत्यपूर्ण आरोग्यसेवा देणे यावर आहे. जेणेकरून आजार सांभाळताना त्यांच्यावरचा आर्थिक आणि मानसिक ताण कमी होईल.”

झेनोमुळे, नाशिकमधील रहिवाशांना आता त्यांची सर्व औषधे एकाच ठिकाणी मिळवता येतील. त्यांना आता एका फार्मसीमधून दुसऱ्या फार्मसीमध्ये जावे लागणार नाही. झेनो फ्री आणि फास्ट डिलिव्हरी देखील देत आहे, जे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त आहे. ग्राहक फक्त एका फोन कॉलद्वारे किंवा झेनो हेल्थच्या ॲपद्वारे त्यांच्या ऑर्डर्स देऊ शकतात. ज्यांना स्टोरला भेट देणे आवडते ते नाशिकमधील झेनो हेल्थच्या कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये जाऊन उच्च दर्जाची परवडणारी औषधे घेऊ शकतात.

झेनो हेल्थ बद्दल :

2017 मध्ये आयआयटी (IIT) बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी स्थापन केलेले, झेनो हेल्थ हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ओम्नी-चॅनेल फार्मसी नेटवर्कपैकी एक आहे, कंपनीचे ध्येय म्हणजे — भौगोलिक स्थान किंवा उत्पन्न काहीही असो, प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आरोग्यसेवा, सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे. 200 हून अधिक भौतिक स्टोर्स, एक अॅप आणि वेबसाइट यांच्या विश्वासार्ह उपस्थितीसह, झेनो परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे उपलब्ध करून देत आहे.

झेनो ने आधीच 30 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली असून, ब्रँडेड व जेनेरिक औषधांवर ₹1,000 कोटींहून अधिक बचत करून दिली आहे. झेनो फक्त परवडणाऱ्या किमतींवरच नाही, तर जागरूकता निर्माण करण्यावर, विश्वास मजबूत करण्यावर आणि मेट्रो शहरांपासून दुर्गम शहरे आणि खेड्यांपर्यंत औषधांची सोपी उपलब्धता करून देणे यावरही लक्ष केंद्रित करते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News