Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो चे आयोजन दिनांक २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत, ऍग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड, सिंचन नगर, पुणे येथे करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भव्य एक्स्पोमध्ये ५०० हून अधिक स्टॉल्स असणार असून, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचा एकत्रित प्रवास याठिकाणी अनुभवता येणार आहे. या बिझनेस एक्स्पोमध्ये खाद्य प्रक्रिया, कृषी, बांधकाम, फायनान्स, ऍक्सेसरीज यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असणार असून, उद्योजकांसाठी व्यवसायविस्तार, नव्या संधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपर्काचे दालन खुले होणार आहे.
तसेच MEA चा नाशिक येथे लवकरच प्रारंभ होत असून, यासाठीचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, रोयाल हॉल, हॉटेल एक्स्प्रेस इन, नाशिक येथे पार पडणार आहे. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, एम.एस.एम.ई. प्रतिनिधी, स्टार्टअप संस्थापक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) हे मराठा समाजातील उद्योजकांसाठी एक सक्षम व संघटित व्यासपीठ असून, व्यवसायवृद्धीसाठी नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण, मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच विविध विकासाभिमुख उपक्रम राबविते. पुणे येथे पार पडणारे हे भव्य इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो सर्व उद्योजकांसाठी एक भव्य पर्वणीच असणार आहे. तसेच नाशिक येथे MEA चा प्रारंभ झाल्यामुळे स्थानिक उद्योजकांना एक प्रभावी मंच उपलब्ध होणार असून, त्यांच्या उद्योग-व्यवसायाच्या वाढीस निश्चितच चालना मिळणार आहे. यावेळी MEA चे कार्यकारी समिती सदस्य अभिषेक बिरारी, डॉ. संदेश पवार, ऍड. मनज्योत पाटील, साहिल न्याहारकर, आशिष देशमुख, सुशांत जाधव, निखिल देवरे, अभिषेक मोरे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




