दस-यालाच शमी वृक्षाचे पूजन का करावे ? इंद्राने कुबेरला कोणते आदेश दिले होते

Oct 7, 2019

दसराला सर्वांनी प्रदोषकाळात शमी वृक्षाच्या खाली धूप-दीवा लावून पूजा करुण खालील मंत्र म्हणावा असे केल्याने जातकाच्या सर्व इच्छापुर्ती लवकरात लवकर होते.

शमी शम्यते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ।।
करिष्यमाणयात्राय यशाकालम्र सुखम्र मया ।।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ।।

आश्विन महिन्यातील नवरात्री नंतर दहावा दिवस विजयदशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. या शुभ मुहर्तावर काही ठिकाणी रावण जाळण्याची परंमपरा आहे तर काही ठिकाणी शमी वृक्षाचे पाने सोने समजून आदान-प्रदान केले जाते. तर काही प्रातांत हया वृक्षाची पूजा केली जाते.
शमी वृक्षामध्ये शनिमहाराजांचा निवास असल्यामुळे दसराच्या शुभमुर्हतावर यांचे पूजन जर केले तर काय- काय लाभ जातकाला मिळतात याचे विवेचन आज आपण येणा-या दसरा सणाच्या आचित्यार्थ अधिकाधिक वाचकांकडून याचे पूजन घडवून यावे हे आहे.यासाठी आपण शमी झाडाचे पूजनाबाबत ज्ञानवृध्दी व्हावी यासाठी छोटासा प्रयत्न करणार आहोत. म्हटले जाते की शमी वृक्षाचे पूजन प्राचीन काळापासून क्षत्रिय घराणे करत आलेले आहे. पांडवांनी हयाच वृक्षावर युध्दासाठी हत्यार लपविलेले होते त्यानंतर त्यांनी कौरवांवर विजय प्राप्त केला.शमी वृक्षाचे नियामित पूजन केल्याने घरामध्ये नेहमी सुख शांती नांदते. दसराच्या दिवशी पूजनाने अधिक पुण्य प्राप्त होते.
ज्योतिषशास्त्रात सुध्दा शमीच्या फांदयावर फुटणारा पाला,पाने,बहर यांच्या वाढीवरुन येणारे वर्ष सुखी संपन्न आहे की नाही बघितले जात होते.विजयादशमीच्या दिवशी प्रदोषकाळात शमी वृक्षांची पूजा करणे आवश्यक आहे. यावेळेस झाडाची काही पाने तोडून लाल कपडयात अक्षता व एक सुपारी ठेवून याचे गाठ बांधावी.त्यांनतर हे बांधलेले पिशवी आपल्या गुरुच्या किंवा वडीलधा-या व्यक्तींच्या हाथून घेऊन श्रीराम मंदिरात जाऊन त्यांची 11 परिक्रमा करावी. श्रीरामाची विशेष कृपा जातकावर होते.
दसरा आणि शमी झाडा बाबत एक जुनी गोष्टी प्रचलित आहे. ऋषी वर्तन्तु चे शिष्‍य कौत्स होते. कौत्सची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर ऋषीनी त्याच्याकडे गुरु दक्षिणा म्हणून 14 करोड स्वर्ण मुद्रा मागितली होती.शिष्य कौत्स गुरुला दक्षिणा देण्यासाठी महाराज रघुच्या जवळ जाऊन मागणी करतात. त्यावेळी महाराजांचा खजाना पुर्ण रिकामा झालेला असतो. त्यावेळी राजाने तीन दिवसांची मुदत मागितली होती. राजा विविध प्रकारे धनसंपत्ती वाढविण्साठी उपाय योजना करु लागतो.शेवटी राजा कुबेर कडे मदत मागतो परंतु कुबेर सुध्दा मदत करण्यास मनाई करतो. शेवटी राजा स्वर्गावर हल्ला चढवून धन प्राप्त करण्याचा विचार करतो. राजाच्या हया विचारामुळे इंद्रदेव घाबरतो आणि कुबेराला रघुराजाच्या राज्यात स्वर्ण मुद्रांचा वर्षाव करण्याचे आदेश देतात. इंद्राच्या आदेशावर कुबेर रघुराजाच्या राज्यात स्वर्ण वर्षावर करण्यासाठी शमी वृक्षाचे निवड करतो. झाडांची सर्व पाने सोन्याची करुन सुवर्णवर्षा करतो. तेव्हा पासून दसराला शमीच्या झाडाची पूजेचे महत्व प्राप्त आहे.
शमीच्या झाडाच्या नियामित पूजनाने शनीमहाराजांचा प्रकोप कमी होऊन जातकाच्या प्रगतितील अडथळे दूर होतात.शमीचे झाड घराजवळ लावल्यास नियामित त्या घरावर देवी-देवतांची कृपा होत राहाते.ज्या घराजवळ शमीचे झाड असते त्या घरावर तंत्र-मंत्र, नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो. म्हटले जाते की शमी वृक्षाच्या खाली बसून कवी कालिदासने तप केल्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते.

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News