‘ जितो नाशिक अपना हाट बाजाराचे ‘ आयोजन

Oct 11, 2019

घरगुती दिवाळीचे खादय पदार्थ विक्रीसाठी लघु व्यवसायिकांनी मिळणार संधी

नाशिक : दिवाळी सणा निामित्त समाजातील होतकरु,उदयोन्मुख तसेच घरगुती व्यावसायिकांसाठी जितो नाशिक ने अपना हाट बाजार हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या व्यावसायिकांना एक उत्तम बाजार पेठ मिळावी हया उददेशाने जितो
नाशिक अपना हाट बाजार हि संकल्पना गेल्या 2 वर्षांपासून राबवित आहेत व त्याला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हाट बाजार मध्ये व्यावसायिकांसाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम जितो नाशिक सलग 2 वर्ष करीत आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना घरी दिवाळीचे पदार्थ किंवा इतर वेळ जास्त लागणारे पदार्थ बनवणे शक्य होत नाही त्याचा त्यामुळे हाट बाजारमध्ये सहभागी होणारे छोटे व्यावसायिक आणि व्यस्त लोकांसाठी हि एक चांगली संधी
चालून आली आहे.हे पदार्थ घरी बनवले असल्याने आरोग्यदायी,चविष्ट आणि योग्य दरात मिळतात. 100 पेक्षा जास्त स्टॉल्स असून हयात दिवाळी फराळ, विविध खादय पदार्थ, केके, चॉकलेट, विविध मसाले, लोणची, डेकोरेटिव्ह आयटम, ड्रेस
मटेरियल, कॅण्डल्स इ. विविध प्रकारचे स्टॉल्स येथे असणार आहेत. त्याच बरोबर हया हाट बाजारात गरम व चमचमित पदार्थांची रेलचेल असणार आहे.
येत्या रविवारी दि. 13/10/2019 रोजी दु. 3 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक येथे अशा प्रकारे हाट बाजार आयोजित केला असून हया हाट बाजार सर्व नाशिककरांनी याचा आनंद घ्यावा असे जितो नाशिक ट्रेड
फेअर कमिटीचे कन्वेंर अभय तातेड, को कन्वेंर,संदीप कटारिया, सचिन शाह, विजय लोहाडे, विजय वेदमुथा, सोनल दगडे,तसेच जितो नाशिक चे अध्यक्ष शांतीलाल बाफणा व चीफ सेक्रेटरी सी ए सतीश हिरण हयांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News