समाज सेवेच्या बाबतीत भारतीय उद्योगपती कुणाही पेक्षा कमी नाहीत, गरीबांच्या मद्तीसाठी आणि कल्याणासाठी देशाचे उद्योगपती नेहमी आघाडीवर रहातात. परोपकाराच्या भावनेने ओत-प्रोत होवुन बरेच उद्योगपती अनेक वर्षांपासुन गरीबांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत, परंतु समाजसेवाचे कार्य देशाच्या अति दुर्गम ग्रामीण आणि आदिवाशी क्षेत्रामध्ये करायचे असेल, जिथे अतिगरीबी आहे, शिक्षण व रोजगाराचा अभाव आहे, पायाभुत सुविधांच्या अभाव आहे, अशा ठिकाणी गरीबांच्या भल्यासाठी आणि उत्थानासाठी जर कार्य होत असेल तर ते निश्चितच प्रशंसनीय आहे. कारण असे मागसलेले आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये समाजसेवेची सर्वात जास्त गरज असते.
श्री. पुरुषोत्तम अग्रवाल यांच्याद्वारा संचलित समता फाउंडेशन ही अशी संस्था आहे, जी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे मागसलेले आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रामधील गरीब परीवारांची सेवा, मदत आणि कल्याणासाठी सर्मपीत काम करते. समता फाउंडेशन ही मागील 7 वर्षापासुन गरीबांची सेवा, स्वास्थ देखरेख आणि कल्याणासाठी कोणत्याही प्रचार प्रसाराविना अत्यंत प्रशंसनीय काम करत आहे. जे इतर उद्योग समुहासाठी एक नवीन आदर्श ठरत आहे. समता फाउंडेशन ही जात पात आणि धर्मांच्या वर उठुन ग्रामीण आणि आदीवासींच्या सर्वांगीन विकासाठी, त्यांच्या स्वास्थ्याच्या देखरेखीसाठी, शिक्षण जागरुकता आणि स्वयं रोजगारासाठी काम करत आहे.
फाउंडेशनचे मुख्य कार्य गरीबांना मोतीबिंदुपासुन मुक्तकरुन त्यांच्या जिवनात नवीन पाहाट आणने आहे. मागील 1 वर्षामध्ये 1 लाख पेक्षा अधिक तर आता पर्यंत 3 लाख 89 हजारपेक्षा जास्त गरीबांचे मोतीबिंदु अॅापरेशन केले आहे. तसेच ग्रामीण शाळेतील 66 हजार विद्यार्थांना संगणक (कॅाम्प्युुटर) शिक्षा देत आहे. आदिवासींना जागृत करुन त्यांना फॅमिली प्लॅानिंग विषयी अर्थात परीवार नियोजनासाठी प्रेरित करत आहे, कारण ग्रामीण भागामध्ये मोठा परीवार हे वाढत्या गरीबीच मुख्य कारण आहे. कुपोषणाने ग्रस्त ग्रामीण महिलांची स्वस्थ देखरेख करुन त्यांना पोषक आहार देत आहे. शाळेतील विद्यार्थी व महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संगणक शिक्षा आणि टेलरींगची ट्रेनिंग देवुन आत्मनिर्भर बनवत आहे. कारागृहातील कैद्यांचा उपचार आणि संगणक शिक्षा सोबत रचनात्मक, कार्यासाठी प्रेरीत करत आहे. ज्याप्रमाणे फाउंडेशनच्या सेवेचा विस्तार होत आहे. त्याप्रमाणे फाउंडेशनचा खर्चही वाढत आहे.वित्त वर्ष 2019-20 मध्ये फाउंडेशने गरीबांच्या कल्याणासाठी सर्वाधिक 17 कोटी 50 लाख रुपये खर्च करत आहेत. समाजसेवेच्या या सर्व कार्याचा खर्च आग्रवाल परीवार व समता फाउंडेशन स्वत: करत आहे.
मानव सेवा हीच ईश्वर सेवा- अग्रवाल
समता ग्रुपचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल या मतानुसार सगळ्यात महान आणि मोठा धर्म म्हणजे मानवसेवा होय, समाजच आपल्याला देत असतो आणि म्हणुन समाजातील गरजु लोकांची मदत करने आपले कर्तव्य आहे. गरीबांची सेवा आणि कल्याण करुन जो आनंद त्यांच्या जीवनात येतो तो आम्हाला आणखी जास्त कल्याणकारी कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि सामर्थ्य देतो. देशाच्या अतिदुर्गम ग्रामीण आणि आदीवासी भागामध्ये अतिगरीबी आहे. सरकार आपल्या स्थरावर त्यांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी निरंतर प्रयास करत आहे, परंतु या कार्यामध्ये सर्वांच्या सहभागाची गरज आहे. जर आपण सर्व या कार्यासाठी तनमनधनाने सरकारला सहकार्य केले तर त्यांना आणखी जास्त यश मिळेल. ज्यामुळे भारत हा गरीबीपासुन मुक्त होवुन एक संपन्न राष्ट्र बनेल. फाउंडेशन याच भावनेने गरीबांची सेवा व कल्याणकारी कार्य करत आहे.





