सामाजिक कार्याची सर्वानी दाखल घ्यावी : जनाब अमिल साहेब मुस्ताली भाईसाहब, मुख्य धर्मगुरू, अंजुमन हकीमी जमात
नाशिक – नाशिकच्या टाकली रोड, द्वारका येथील एम. एस. बी. एज्युकेशन इंस्टिट्यूटच्या वतीने सर्वांना पौष्टीक आणि कसदार अन्न कसे मिळेल यासाठी
रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन हकीमी जमातचे प्रमुख धर्मगुरू जनाब अमिल साहेब मुस्ताली भाईसाहब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाजातील प्रत्येकाला आपल्याला परवडेल या खर्चातच सकस आणि पौष्टीक अन्न कसे मिळाले पाहिजे याचे मार्गदर्शन प्रमुख धर्मगुरू जनाब अमिल साहेब मुस्ताली भाईसाहब यांनी या रॅलीमध्ये केले. त्यांनी पुढे सांगितले की समाजात अश्या प्रकारची जनजागृतीसाठी झाली पाहिजे आणि लहान मुले / विदयार्थी यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे, आणि त्यामुळे सर्वप्रथम मुलांना याची माहिती मिळाली पाहिजे, आणि मुलांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे, म्हणजेच संपूर्ण समाजात हा बदल दिसून येईल असे सांगितले. या रॅलीमध्ये एम. एस. बी. स्कुलच्या ५वी ते १० वीच्या १२० मुलांनी सहभाग घेतला. या रॅलीमध्ये बोर्डद्वारे आणि घोषणा देऊन मुलांनी या उपक्रमाची माहिती सर्वांना दिली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये फूड बँक तयार केली आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही त्यामध्ये सकस अन्न देऊन याला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थांनी सकस आणि पौष्टीक अन्ना विषयी जनजागृती व्हावी यासाठी वारंवार घोषणा दिल्या. या रॅलीदरम्यान उपस्थितांनी काही शंका उपस्थित केल्या त्याचेही जनाब अमिल साहेब मुस्ताली भाईसाहब यांनी अगदी सोप्या भाषेत निराकरण केले. आणि अश्या सामाजिक उपक्रमासाठी बोहरा समाज नेहमीच अग्रेसर राहील आणि याचा पाठपुरावाही करील असे सांगितले. या रॅलीला या परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि एम. एस. बी. एज्युकेशन इंस्टिट्यूटच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून अश्या उपक्रमामुळे नक्कीच समाजात बदल घडून येईल अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.