6 महिन्यांमध्ये आयसीव्ही श्रेणीमध्ये ठरली चौथ्या क्रमांकाची कंपनी, लवकरच या श्रेणीतील फुल-रेंज कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल ,कर्मचारी व शाळा या श्रेणीमध्ये लाँग प्लॅटफॉर्म ओव्हरहँग (एलपीओ) बसेसची नुकतीच अनावरण केलेली क्रुझिओ रेंज व्यावसायिक पद्धतीने दाखल करणार.
सर्व्हिस व स्पेअर यांच्या व्यापक जाळ्याचे पाठबळ – 100 हून अधिक 3S डीलरशिप, 210 अधिकृत सर्व्हिस सेंटर्स, रिटेल आउटलेटचे व्यापक जाळे, काश्मीर-कन्याकुमारी, दिल्ली-मुंबई व कोलकाता-चेन्नई अशा 3 सर्व्हिस कॉरिडॉर्स व मोक्याच्या ठिकाणी असणारे 39 हून अधिक पार्ट्स प्लाझा.
मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचा भाग असणाऱ्या कंपनीने ब्लेझो या आपल्या ट्रक उत्पादनांनी ट्रक उद्योगामध्ये मायलेजच्या बाबतीत आघाडीचे स्थान साध्य केले असल्याचे जाहीर केले आहे. ब्लेझो ट्रक उत्पादने दाखल झाल्यापासून केवळ 3 वर्षांमध्ये त्यांनी हे आघाडीचे स्थान निर्माण केले आहे आणि सध्या अन्य स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत जोरदार विक्री करत आहे.
एमटीबी BSVI उत्पादने सादर करून आपले स्थान अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांसाठी BSVI सुलभ करण्याचाही कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, BSVI प्रकारातील 80% भाग बदलले जाणार नाहीत.
कंपनीने 16-चाकी श्रेणीमध्ये ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक दाखल केला असून, त्यामध्ये अधिक मायलेज व पेलोड हे ब्लेझोचे मूलभूत फायदे समाविष्ट आहेत. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आयसीव्ही (इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल) श्रेणीमध्ये, 12 टन व 14 टन या श्रेणींमध्ये चौथ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावारूपास येऊन एमटीबीडीच्या फ्युरिओने लक्षणीय यश मिळवले आहे. कंपनीने आणखी तीन प्रकार अलीकडेच दाखल केले आहेत आणि उत्पादनांत वाढ करण्याच्या अनुषंगाने आयसीव्ही श्रेणीमध्ये 5 ते 18 टनांमध्ये आणखी 18 प्रकार दाखल करणार आहे.
याविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी नमूद केले, “एचसीव्ही श्रेणी सध्या कठीण काळातून जात असताना, या श्रेणीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य आणण्याची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटते. यामुळेच ब्लेझोने मायलेजच्या बाबतीत प्रचंड यश मिळवले आहे. विविध प्रकारचे ट्रक व बस, नवे सुलभ तंत्रज्ञान आणि खात्रीशीर अधिक मायलेजचे विशेष वैशिष्ट्य यामुळे आम्ही BSVI कम्प्लायंट बनण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “मायलेजच्या शाश्वतीबाबतचे आमचे वैशिष्ट्य कायम राखत, 16-चाकी श्रेणीतील नवा ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक अधिक मायलेज व पेलोड याद्वारे अधिक बचत करतील व अधिक उत्पन्न मिळवतील, याची दक्षता घेतो. फ्युरिओ ही आमची नव्याने दाखल केलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. येत्या काही महिन्यांत या उत्पादनांचे 18 नवे प्रकार दाखल करून आम्हाला या श्रेणीतील फुल-रेंज कंपनी बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. कर्मचारी व शाळा या श्रेणीतील लाँग प्लॅटफॉर्म ओव्हरहँग (एलपीओ) बसेसची क्रुझिओ रेंज व्यावसायिक पद्धतीने दाखल करणार आहोत.”
कंपनी मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीर व ईशान्य अशा महत्त्वाच्या ठिकाणी आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या सहामाहीत हॉलेज श्रेणीतील (मल्टि अॅक्सल व्हेइकल व + ट्रॅक्टर ट्रेलर) तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावारूपास आली आहे.




