स्मार्ट एशिया 2019 चे उद्घाटन चुंग-क्वान टीएन यांच्या हस्ते करण्यात आले

Oct 18, 2019

स्मार्ट एशिया 2019, हा स्मार्ट सिटी पर्याय,  स्मार्ट टेक्नोलॉजी अॅप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने व सेवांसंबंधी लक्ष केंद्रित करणारा एक उपक्रम आहे. ज्याचे उद्घाटन   बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले. याचे आयोजन तैवान  एक्सर्टनल ट्रेड डेव्हलमेंट कौन्सिल समवेत फेडरेशन ऑफ इंडियन     चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री द्वारे      करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन  भारतातील तैपेई इकनॉमिक अँड कल्चर सेंटरचे  प्रतिनिधी, अम्ब.   श्री. चुंग-क्वान टीएन यांच्या हस्ते करण्यात आले.

स्मार्ट एशिया 2019 च्या मदतीने मुंबईत स्मार्ट वाहतूक, स्मार्ट उर्जा, स्मार्ट जल व्यवस्थापन,  शाश्वत पर्यावरण, आयओटी आणि तत्सम इतर पर्याय उपलब्ध होण्यात साह्य होईल.

तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलमेंट कौन्सिल  च्या एक्झिबिशन डिपार्टमेंट  एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एमिलीया शीह  म्हणाल्या की, स्मार्ट सिटी उभारणे हा एक ग्लोबल ट्रेंड झाला आहे. जगातील निम्म्याहून अधिक जनता ही  शहरांत  राहते आणि 2050 पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक लोक शहरांकडे कूच करणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट सिटी उभारण्याकडे लक्ष देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. जेणेकरून शहरी रहिवाशांचे जीवनमान सुधारेल.देशाची आर्थिक राजधानी म्हणून आणि सध्याच्या वीज वापराचे ट्रेंड्स तसेच वाहतूक व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांसह, मुंबई  व त्याच्या आसपासच्या शहरांना शाश्वत पर्यावरणीय पर्यावरण सुनिश्चित करण्यासाठी अक्षय ऊर्जेची  स्मार्ट सोल्युशन्स अवलंबणे अत्यावश्यक आहे. आमचा विश्वास आहे की स्मार्ट उर्जा, परिवहन आणि पाणी व्यवस्थापनावर आपले प्राथमिक लक्ष असलेले स्मार्ट एशिया 2019 या विषयात कायमस्वरूपी बदल करण्यास बांधील आहे. शिवाय, भारत आणि तैवान यांच्यात दीर्घ काळापासून  उत्पादक भागीदारी केल्यामुळे  परस्पर फायदेशीर आर्थिक वाढीसह स्मार्ट आशिया भारताच्या कायम विकसनशील गरजा भागवू शकेल  असा  आमचा विश्वास आहे, असे त्या पुढे.  म्हणाल्या.

भारतातील तैपेई इकनॉमिक अँड कल्चर  सेंटरचे प्रतिनिधीअॅम्बश्री.               चुंगक्वान टीएन म्हणाले की,    आज मला सांगायला अभिमान वाटतो की, दोन देशांतील व्यापारी व्यापारी आकडे सहा पटींनी वाढून 7.5 अब्जांवर पोहोचले आहेत. भारत आणि तैवान दरम्यानचे व्यापारी संतुलन महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ते कायमच आरोग्यदायक आणि  सु-संतुलित  राहिले आहे. भारतीय हार्डवेअर आणि तैवानी सॉफ्टवेअर व स्मार्ट शिक्षणाच्या संगमाने आपण भारतात खरोखर स्मार्ट सिटी निर्माण  करू शकतो. माझ्या  भारतीय भागीदारांनी दिलेल्या सगळ्या पाठबळाविषयी मी त्यांचे इथे आभार मानतो.

 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News