नाशिकच्या HCG क्यूरी मानवता सेंटर मध्‍ये पहिले सर्जिकल रोबोटिक सिस्टीम कार्यान्वित

Oct 19, 2019

काय आहे रोबोटिक सर्जरीचे फायदे ?
अत्यंत छोटी जखम, हॉस्पीटलमधून लवकर डिचार्ज, जोखीम कमी, रुग्ण लवकर बरा होतो, दुखापत कमी, रक्तस्त्राव कमी प्रमाणात, रुग्ण दैनदिन कामे लवकर सुरु करतो.
कोणत्या सर्जरी रोबोटिक द्वारे शक्य?
लठठपणा, गर्भपिभवी विकार, जठर, अन्ननलिकांचे विकार, थायरॉईड ची सर्जरी तोंडमधून करणे शक्य, फुप्फुस, युक्रत, पित्ताशयांचे खडे, गुदाशय, लघवीच्या प्रोस्टेट ग्रंथी आदी.

नाशिक – नाशिकमधील HCG क्यूरी मानवता कॅन्सर सेंटर येथे व्हर्सियस®, एक पुढच्या पिढीतील सर्जिकल रोबोटिक सिस्टीम परिचित करून दिली गेली आहे. या लक्षणीय परिचयाने पश्चिम महाराष्ट्र प्रदेशातील सर्वात पहिली रोबोटिक प्रणाली चिह्नित केली गेली आहे. डॉ. राज नगरकर यांच्या नेतृत्वाखाली व्हर्सियसचा वापर करून एका विस्तृत श्रेणीतील शल्य प्रक्रिया केव्हाच पार पाडल्या गेल्या आहेत.
HCG मानवताचा प्रवास मे 2007मध्ये एका 35 बेडच्या हॉस्पीटलसह सुरू झाला आणि नंतर त्याचे महाराष्ट्रातील एका 275 बेडच्या अत्याधुनिक, विकसित ऑन्कॉलॉजी चिकित्सा सेंटरमध्ये परिवर्तन झाले. डॉ. राज नगरकर, चीफ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, आणि मानवता कॅन्सर सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर व्हर्सियस वापरणाऱ्या टीमचे नेतृत्व करतील. डॉ. नगरकर ऑन्कॉलॉजी चिकित्सेमध्ये अग्रणी असून, त्यांनी स्वतः सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये विशेषज्ञता प्राप्त केली आहे. त्यांनी हे सेंटर स्थापित करून तसेच कॅन्सर चिकित्सेमध्ये एका एकात्मिक दृष्टीकोनाचे नेतृत्व केले आहे जो पेशंटना शक्य तितक्या लवकर योग्य उपचार आणि आधार देण्यावर केंद्रीत आहे.
व्हर्सियसचा परिचय पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी रोबोटिक सहाय्यासह लॅप्रोस्कोपिक जनरल आणि ऑन्कॉलॉजिकल चिकित्सा उपलब्ध करून देईल, ज्यामुळे किमान प्रवेश शल्यक्रिया सर्वांसाठी उपलब्ध आणि परवडण्याजोग्या बनवण्याच्या आमच्या ध्येयाला समर्थन मिळेल. नाशिक आणि आसपासच्या शहरांमधील लोकांना हे नवीन युगातील वैद्यकीय तंत्रज्ञान एका वाजवी किंमतीत उपलब्ध होईल. रोबोटिक प्रक्रिया जसे कोल्सिस्टेक्टोमी, हिस्टरेक्टोमी, LAR, APR, सर्व युरॉलॉजी प्रक्रिया मानवता कॅन्सर सेंटरमध्ये पार पाडल्या जाऊ शकतील.
“मानवता कॅन्सर सेंटरने नेहेमीच अत्याधुनिक कॅन्सर उपचार वापरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आम्ही एक नाविन्यपूर्ण, पेशंटसाठी कमी खर्चिक प्रणाली म्हणून व्हर्सियस सिस्टीम संपादित करण्यात अत्यंत आनंदीत आहोत, जी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना गुणवत्तायुक्त कॅन्सर चिकित्सा उपलब्ध करून देण्यासाठी आमची वचनबद्धता अधिक पुढे नेण्यात सक्षम करेल, ज्यांना आत्तापर्यंत रोबोटिक शल्यक्रियेचे लाभ उपलब्ध झालेले नव्हते. किमान प्रवेश प्रक्रियेमुळे हॉस्पीटलमध्ये राहावे लागण्याचा वेळ आणि वेदना कमी होणार आहेत आणि त्याचवेळी अधिक उत्तम परिणाम मिळणार आहेत. रोबिटिक सिस्टीमने आमच्या सर्जिकल शस्त्रागारामध्ये अतिरिक्त कौशल्याची भर टाकली आहे” डॉ. राज नगरकर म्हणाले.
व्हर्सियस® एक पुढच्या पिढीतील सर्जिकल रोबोटिक सिस्टीम म्हणून, आपले छोटे स्वरूप, बहुविज्ञता आणि सुवाहकता घटकांसह किमान प्रवेश शस्त्रक्रियांचे लाभ देण्यात सर्जनना सहाय्य करण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. मानवता हे CMR सर्जिकल, UKकडून व्हर्सियस, एक पुढच्या पिढीतील सर्जिकल रोबोटिक सिस्टीम प्राप्त करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि जगातील दुसरे रोबोटिक सेंटर बनले आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News