VIBGYOR GROUP चे इंग्लिश स्कूल नाशिकमध्ये सुरु , ॲडमिशन प्रक्रिया लवकरच होणार सुरु !

Oct 23, 2019

काय आहे शाळेचे वैशिष्टये ?
विबग्योरचा प्रवास २००४ मध्ये मुंबईत सुरू
भारतात सध्या 40 ठिकाणी स्कुलच्या शाखा स्थापन
CBSC बोर्डचे प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्केटिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, ज्युडो चे प्रशिक्षण
संगीत,नृत्य,वकृत्व आणि नाटक यामधील ऍथलेटिक आणि कलात्मक क्रिया
सुरक्षित वातावरण सीसीटीव्ही
उच्च प्रशिक्षित अभ्यासक्रम तज्ज्ञांच्या शिक्षक व कर्मचारी वर्ग

नाशिक : भारतातील के १२ शाळेची सर्वात मोठी साखळी असलेल्या विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स ने पहिल्यांदाच नाशिक शहरात पदार्पण केले आहे. त्यांनी त्यांची विबग्योर ‘रूट्स अँड राईज’ शाळा नाशिक मध्ये २३ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरु केली आहे. दर्जेदार शिक्षण व येणाऱ्या पिढीस शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण्यास कटिबद्ध असलेला विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स आता नाशिकरांना सेवा देण्यास सज्ज झाला आहे. सदर शाळा प्लॉट नंबर ३ सर्वे नंबर ७५/२ समर्थ नगर मखमलाबाद नाशिक येथे सुरु करण्यात आली आहे.
ही नवीन शाळा दोन एकर क्षेत्रात पसरलेल्या, अद्ययावत 8 मजली इमारत, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवात्मक शिक्षण सुविधा आणि मुलांच्या सुप्त कौशल्यां ना वाव देण्यासाठी उपयुक्त सुविधांनी सुसज्ज असेल. शाळेची सुरुवात झाल्यानंतर, शाळेत सुमारे 2500 विद्यार्थ्यांचा अंदाजे समावेश असेल. पहिल्या वर्षादरम्यान, प्रत्येक चरणात त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी 50 नामांकित आणि अनुभवी शिक्षक असतील. या नवीन शाळेच्या नाशिक मधल्या आगमनाचा उद्धेश नाशिक शहरात अत्याधुनिक सुविधा आणि साधनांच्या आधारे नाशिक मधील मुलांना दर्जेदार शिक्षण प्रदान करणे हा होय. विबग्योरचा अनन्य साधारण अभ्यासक्रम तज्ज्ञांच्या पथकाने तयार केलेला आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मंडळाने ठरविलेल्या मानदंडांवर आधारित उच्च-गुणवत्तेची शिक्षण सामग्री उपलब्ध करुन देते तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शकतत्त्वांचे तपशील देखील आहेत. विबग्योर शाळेच्या सर्व शाखांमध्ये अभ्यासक्रमाचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक एकाचवेळी सामान धडा शिकवत असतात त्यामुळे पालकांच्या व्यवसायामुळेमुळे जर विद्यार्थ्यास शाळा बदलावी लागत असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.

 “येत्या काळात नाशिक हे शिक्षणाचे केंद्रस्थान म्हणून उदयास येणार असून येथे अनेक मोठे इन्स्टिट्यूट स्थापन केल्या जातील. हे शहर जगातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक मध्ये गणल्या जात आहे तसेच आयटी क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र वेगाने विकसित होत आहे.”  –   श्री मानस सिंग, विपणन प्रमुख विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स 

अजून बातम्या वाचा..

Breaking News