4 सुवर्ण, 6 रौप्य पदकांचाही समावेश, वाईनचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित
नाशिक : इंडियन वाईन अवॉर्डस 2019 मध्ये चमकदार कामगिरी करत सुला विनियार्ड्सने तब्बल तेरा अवॉर्डस पटकावले आहे. नुकताच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुलाला सन्मानित करण्यात आले आहे. 4 सुवर्ण, 6 रौप्य पदकांची यात समावेश आहे.
सुला रिझलिंग 2019 ने चिकन कुंग पाओ सोबत उत्कृष्ट पेअरिंगसाठीचा पुरस्कार पटकावला आहे. ‘सोर्स ग्रेनाश रोझे 2019 इंडिया’ला द ट्रपिचे ओक कास्क मालबेक 2018, अर्जेन्टिना सोबत ‘बेस्ट इन शो’ पुरस्कार मिळाला आहे.
प्रत्येक बॉटलवर असलेल्या उल्लेखनीय स्टिकरद्वारे इतरांपासून वेगळे ठरणाऱ्या व विजेत्यांची सहज ओळख लागू शकते.
दरम्यान इंडियन वाईन अवॉर्डसच्या तिसऱ्या हंगामात नामनिर्देशित 376 वाईन पैकी 116 वाईन पुरस्कार विजेत्या ठरल्या. तर 17 रेस्टॉरंटस त्यांच्या वाईन प्रोग्रॅम्ससाठी सन्मानित करण्यात आले. देश-विदेशातील पात्रताधारक, प्रोफेशनल्स या इंडिया वाईन अवॉर्डसचे नेतृत्व करत असून हा सोहळा भारतातील पहिल्या मास्टर ऑफ वाईन सोनल हॉलंड यांच्या संकल्पनेतून राबविला जातो आहे. त्या ‘सोहो’ वाईन क्लबच्या आणि नेमस्के अकॅडमीच्या संचालिका आहेत.
स्पर्धेत उतरविलेल्या वाईनचे दोन दिवस परीक्षण केले जाते. यंदा सप्टेंबरमध्ये सोनल हॉलंड यांच्या अध्यक्षतेखाली वाईन क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत एकूण 17 परीक्षकांच्या समितीने ही प्रक्रिया राबवत राबवत दोन दिवस परीक्षण केले. विशेष म्हणजे या प्रक्रियेतील टेस्टिंग करतांना उत्पादक, क्षेत्र किंवा अन्य माहिती गोपनीय ठेवली जात असते.
गेल्या वीस वर्षांहून अधिक कालावधीपासून सुला विनियार्ड्स तर्फे सातत्याने भारतातील वाईन उद्योगात स्वतःला प्रस्थापित करत नेहेमी अव्वल स्थान राखले आहे. तसेच वाईन निर्मिती, टुरिझम आणि व्यवसाय वृद्धीच्या अनुषंगाने मैलाचा दगड रोवला आहे. 1999 मध्ये पहिली बॉटल विक्री केल्यापासून सुलाने वाईन बाजारपेठेपैकी 65 टक्के हिस्सा काबीज करत भारतीय वाईन उद्योगात वेगळे अस्तित्व तयार केले आहे. गुणवत्ता, नाविन्यपूर्णतेच्याबाबत आघाडीवर सुलाचे नाव घेतले जाऊ लागले आहे. आपल्या शाश्वत उपाययोजनांमुळे सुलाने 2021 पर्यंत आशिया स्तरावरील शाश्वत वाईनरी म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे.
इंडिया वाईन अवॉर्डस सोहळ्यातील भरीव कामगिरीबाबत सुला विनियार्ड्सचे संस्थापक व सीईओ राजीव सामंत म्हणाले की इंडिया वाईन अवॉर्डस हा भारतीय वाईन उद्योगासाठी अत्यंत महत्वकांक्षी उपक्रम आहे. या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करणारी विश्वासार्ह समिती मिळाली असून, याद्वारे भारतात निर्मित तसेच आयात करून देशात आणलेल्या वाईनला एक प्रकारे मान्यता मिळत आहे. ग्राहकांना यामुळे आपल्या पसंतीनुसार वाईनची निवड करतांना अपेक्षित संदर्भ उपलब्ध झाले आहे.
इंडिया वाईन अवॉर्डस, देशातील सर्वोच आणि बहू प्रतिष्ठित असे पुरस्कार असून वाईन सेवनाचा अनुभव मूल्यवर्धित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात उपयोगी ठरणार आहे.
सोनल हॉलंड म्हणाल्या की 2017 मध्ये इंडिया वाईन अवॉर्डसची सुरवात करतांना गेल्या तीन वर्षातील कामगिरी गौरवशाली राहिली आहे. ही स्पर्धा देशातील सर्वात मोठी, विश्वासार्ह, तर्कसंगत आणि अखंड अशा स्वरूपाची स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
दर्जेदार वाईनला पुरस्कार देतांना, वाईनची ओळख प्रस्थापित करतांना इंडिया वाईन अवॉर्डसचे स्वरूप देखील मोठे आणि विस्तृत होत चालले आहे.
वाईन निर्मितीचे कुशल कौशल्य, दर्जेदार द्राक्षांची निवड करण्याची सुलामधील निरंतर प्रक्रिया ही इंडियन वाईन अवॉर्डसचा सन्मान मिळविण्यासाठी सार्थक ठरते.
सुला वाईन्सला मिळाले पुरस्कार असे-
* सुला रासा झिनफांडेल 2018, भारत (सुवर्ण)
* सुला शेनिन ब्लँक रिझर्व्ह 2019 भारत (सुवर्ण)
* सुला सौवीगनॉन ब्लँक 2019, भारत (सुवर्ण)
* सुला रासा कॅबरनेट सौवीगनॉन 2018, भारत (सुवर्ण)
* द सोर्स सौवीगनॉन ब्लँक 2019, भारत (रौप्य)
* सुला ब्रूट, भारत (रौप्य)
* सुला शेनिन ब्लँक 2019, भारत (रौप्य)
* सुला रासा शिराझ 2018, भारत (रौप्य)
* सुला झिनफांडेल (रेड) 2019, भारत (रौप्य)
* सुला झिनफांडेल रोझे 2019, भारत (रौप्य)
* द सोर्स ग्रेनाश रोझे 2019 (बेस्ट इन शो)
* ट्रपिचे ओक कास्क मालबेक 2018, अर्जेन्टिना (बेस्ट इन शो)
* सुला रिझलिंग 2019, भारत (बेस्ट वाईन पेअरिंग विथ चिकन कुंग पाओ)
सुला विषयी…
‘सुला’ विषयी…
भारतात वाईनसाठीची पहिली पसंती ‘सुला विनियार्डस्’ दिली जातेय. ‘सुला’च्या पुरस्कार प्राप्त वाईन्स देशभरातील नामांकित हॉटेल व रेस्टोरंट्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच जगभरातील तब्बल 25 देशांमध्ये वाईनची निर्यातदेखील केली जाते आहे. 2005 मध्ये देशातील पहिले वाईन टेस्टींग रूम स्थापन करून वाईन टुरीझमच्या क्षेत्रात ‘सुला’ने मैलाचा दगड रोवला आहे. 2007 मध्ये ‘बियॉन्ड’ हे पहिले ‘विनियार्ड रिसॉर्ट’ तर 2017 मध्ये ‘द सोर्स’ हे देशातील पहिले हेरीटेज रिसॉर्ट साकारण्याचा बहुमान ‘सुला’ने पटकावलाय. गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख व्यक्तींनी सुलाला भेट दिली होती. यातून सर्वाधिक व्यक्ती भेट देणाऱ्या जागतिक स्तरावरील वाईनरीजच्या यादीत सुलाने अव्वल स्थानी मजल मारली आहे.
सुलाने वाईन आणि स्पिरीट्स टुरीझमकरीता अत्यंत प्रतिष्ठेचा असा ड्रिक्स बिझनेस अवॉर्ड 2016 पुरस्कार पटकावलाय. विशेष म्हणजे ड्रिक्स बिझनेस पुरस्कार मिळविणारी सुला ही पहिली वाईनरी ठरली आहे. जुलै 2018 मध्ये सर्वाधिक दहा लाख (1 मिलीयन) वाईन विक्रीचा टप्पा गाठणारी सुला ही देशातील पहिली वाईन कंपनी ठरली आहे.
भारतीय वाईन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या सुलाकडून उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबवतांना द्राक्षाच्या उत्पादनात वैविध्यपूर्णता आणली जात असते. शाश्वत शेतीला प्राधान्य व ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून बळकटी देण्याचे कार्य केले जात आहे. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांना प्राधान्य देतांना सुलातर्फे आवश्यकतेच्या निम्या क्षमतेची वीज निर्मिती सौर ऊर्जेतून केली जात आहे. म्हणूनच सुला जगातील शाश्वत वाईनरीज्मध्ये समाविष्ट झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये सुलाने प्रथमच प्रीमियम वाईनरी अवगत केली आहे कर्नाटकमधील विनियार्डमध्ये निर्मिती काडू ही सुलाची धेय्याने प्रेरीत पहिलीच अशी वाईन आहे. देशातील वाघांचे संवर्धन असे धेय्य यामागील आहे.
वाईन आणि स्पिरीट आतातीच्या बाबतीतही कंपनीने आघाडी घेतली आहे. सुला सिलेक्शन्सच्या माध्यमातून जगविख्यात असे रेमी कॉईन्ट्रे, हार्डीज्, कोनो सुर, ले ग्रॅंड नोईर आदी ब्रॅंड्स याद्वारे मायदेशात उपलब्ध झालेले आहेत. सुलाफेस्ट हे जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव म्हणून ओळखले जाऊ लागले असून आगामी फेब्रुवारी 2019 मध्ये फेस्टच्या बाराव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे.




