बळीराजाला आधार देण्यासाठी मी फिरत आहे : शरद पवार

Nov 1, 2019

त्वरीत पंचनामे करण्याची केली मागणी

नाशिक : नाशिक जिल्हयात सर्वात मोठया प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झालेले असल्याने राकांपाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या पहाणी दौ-याची सुरुवात इगतपुरी तालुक्यातपासून केली.मागील काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे या पावसाच्या माऱ्यात सापडलेल्या भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.इगतपुरी तालुक्यातील टाके-घोटी शिवारातील राजाबाई आडोळे यांच्या शेताची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.राज्यात एककीकडे सत्तेसाठी चढउतार राज्यात पहायला मिळत असतांना शिवसेना बरोबर आता राकांपाने शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्याकडे प्राथमिकता देत शेतक-यांची समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा सुरु केला आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानी बाबत शरद पवार इगतपुरीतील शेतक-यांशी बोलेले की, शेतपिकांचे झालेल्या नुकसानीत तुम्ही घाबरु नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सेना सत्तेत मुशगील असल्याचा टोल लागवत मीबळीराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. असे सांगत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येईल माझे पदाधिकारी तुमच्या सेवेत राहतील काळजी नको.

भात पिकांची पाहणी करतांना घोटी टोल नाका ता.इगतपुरी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा यापूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेले आहे. त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी आणि कळवण यातालुक्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान निफाड, बागलाण, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये झालेले आहे. तसेच सर्वात जास्त नुकसान हे मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी लागवडीखालील 7.40 लाख हेक्‍टरक्षेत्रापैकी प्राथमिक अंदाजानुसार साधारण 3.26 लाख हेक्टर म्हणजेच 50 टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे. याअंतर्गत पीकनिहाय विचार केल्यास मका या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण 2.25 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी साधारणतः 60 ते 70 टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 60 हजार हेक्टर क्षेत्रांमधील द्राक्ष बागांचे साधारण 70 टक्केपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भात पिकाचे विशेष नुकसान झाले नसून बाजरी या पिकाचा पेरा 1.10 लाख हेक्टर होता त्याचे 50 ते 60 टक्के नुकसान झालेले आहे.
यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार माणिकराव कोकाटे,हिरामण खोसकर,सुधीर तांबे,माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड संदीप गुळवे,संपत सकाळे,गोरख बोडके,प्रांताधिकारी तेजस चव्हाण,तहसीलदार अर्चना भाकड,-पागेरे,उदय जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाढवे, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष रामदास धांडे यांसह मोठयसंख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

नाशिक तालुक्यातील नुकसान ग्रस्त द्राक्ष बागेला दिल्या भेटी

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News