येत्या 6 ते 8 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा; शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन

Nov 4, 2019

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे बुधवार दिनांक 6 ते 8/11/2019 रोजी नाशिक जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.तरी सर्व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक यांचे मार्फत एका पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे.
ख्रबरदारीचे उपाययोजना म्हणून खालील खबरदारी नागरिकांनी घ्यावी. १. शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा किंवा सुरक्षित साठवणूक करावी. जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल खराब होणार नाही. विशेष काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.
२. वादळामुळे व वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेड , पत्रे, कमकुवत घरे , झाडे , गुरांचे गोठे, पशुपालन शेड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
३.शाळांचे पत्रे, घरांचे पत्रे, कांदा चाळ पत्रे वाऱ्यामुळे उडू शकतात त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी संबंधितांनी याकडे विशेष लक्ष द्यावे.
४.अतिवृष्टीमुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग तात्काळ करावा लागेल त्याकरिता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी या दरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा.विशेष नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे..
५.अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहावे.
६ नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये.
७.विद्युत खांबापासून दूर रहावे.
८. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.
९. वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये.
१०.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
११.धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये.
१२. गोदावरीस पूर आल्यास पंचवटी, रामकुंड क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी.
१३. विजेंचा आवाज होत असल्यास घराबाहेर पडू नये..
१४. पर्यटन स्थळी जातांना हवामानाचा अंदाज घ्यावा.याबाबतची माहिती जिल्हाधिकारी नाशिक तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांनी पत्राद्वारे सुचित केली आहे.

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News