नाशिक : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयातील शेतक-यांना या नुकसानीची झळ कमी बसावे ,सामाजिक बांधिलकी जपवणूक या नात्याने सोमवार दि. 4 रोजी नाशिक जिल्हयातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने या महिन्याचे एक दिवसाचे वेतन म्हणजे एकूण 25 लाख रुपये कपात करुन शेतक-यांना मदत मिळावी असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी यांच्याकडे सुपर्द करण्यात आले.
यावेळी सा.प्र विभगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






