नाशिक – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या मनोगात सांगितले कि, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाचा खरा पाया रचला गेला. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताची अर्थव्यवस्था सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व या निर्णयांमुळेच भारत प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. पंडित नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल, तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला. परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले आहे.
याप्रसंगी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव वाघ, चंद्रकांत साडे, मनोहर बोराडे, अॅड.चिन्मय गाढे, निलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख, हिमांशू चव्हाण, आकाश कोकाटे, राहुल कमानकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





