नाशिक : नाशिक मधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याकडे गेल्या दोन-तीन वर्षापासूनची शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी प्रलंबित आहे.त्यामुळे दोन-तीन वर्षात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केलेली तसेच लग्नकार्य -आजार ,सण वगैरे यासाठी पैसे नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे
यामुळे आज निफाड येथील चौफुली वर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांसमवेत चक्काजाम आंदोलन करण्यात आलेएक तास चारी बाजूने रस्ते बंद करण्यात आले होते.पोलीस प्रशासनाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत तहसीलदार कार्यालयात मिटिंग घेण्यात आली व चर्चेदरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी शासनाने कारखाने ताब्यात घेऊन अवसायक नेमण्यात आले असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
शेतक-यांच्यावतीने आक्रमकपणे बाजू मांडल्या मुळे प्रशासना नमते घ्यावे लागले तहसिलदार साहेब दोन-तीन दिवसातच अवसायक साहेबांची मिटींग लावून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येतील अशा प्रकारे आश्वासन दिलेआणि जर प्रशासनाने आठ दिवसाच्या आत पुढील कार्यवाही केली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने के. जी. एस. साखर कारखान्याचे मालक, संचालक ,एम.डी.,यांच्या घरावर शेतकऱ्यांसमवेत ताबा आंदोलन करण्यात येईल याची साखर कारखाना मालक संचालक व प्रशासनाने घ्यावी असा इशारा देण्यात आला.
या चक्काजाम आंदोलन प्रसंगी उ.म.संपर्कप्रमुख दत्तू बोडके ,नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, नाशिक जिल्हा युवा आघाडी प्रमुख जगन काकडे ,प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख दत्ता आरोटे ,निफाड तालुका प्रमुख अमोल ब्राह्मणे , राजे थेटे, अशोक चव्हाण राजू सोनवणे,पंचवटी कल्पेश कुटे आणि कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.






