शेतकर्यांनी दर्जेदार पिकांचे उत्पन्न वाढविले आहे. त्याचबरोबर त्यांनी विक्रीचे विविध मार्गही शोधण्याचा प्रयत्न गट विक्री-विपणानातून केलेला आहे. शेतकर्यांना आपल्या मालाचा पुरेपुर मोबदला वसूल हवा असेल तर त्यांनी बाजार समित्यांवर विसंबून न राहता, नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा, असे आवाहन स्मार्टसिटी प्रकल्पाचे वरिष्ठ सल्लागार तथा राज्याचे माजी अपर सचिव डॉ. सुधीर गोयल यांनी केले.
ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषीथॉन-2019 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आज महाखरेदीदार आणि विके्रता संमेलनाचे ( बायर अॅन्ड सेलर मीट) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधीर गोयल उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित खरेदीदार आणि विके्रत्यांना मार्गदर्शन केले. संमेलनवेळी व्यासपीठावर हेल्कॉनचे सीईओ सुधीर सेन, की एक्स्पोर्ट कंपनीचे उमेश सस्ते, हनुमंत लोंढे, ग्रीन फिल्ड अॅग्रो कंपनीचे अमोल गोर्हे, डेल्टा ग्लोबल कंपनीचे प्रसाद मेस्त्री, महा एफपीसी कंपनीचे एकनाथ सानप, आत्मा प्रकल्पाचे हेमंत काळे, अपेडाचे विभागीय प्रमुख आर. रविंद्र, वेदांत डॉट कॉमचे सुमीत अनुजे, बिग बास्केटचे दीपक भोसले, ओम गायत्री नर्सरीचे रुषीकेश गवळी, वरूण अॅग्रोचे प्रकाश सपकाळे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकर्यांना माल विक्री व्यवस्थापनाचे कानमंत्र देताना डॉ. गोयल म्हणाले की, कृषीथॉनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बायर आणि सेलर मीटमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला दलाल विरहीत उत्पादने शेतकर्यांकडून खरेदी करायची आहेत. तर मग शेतकर्यांनीही आपल्यातील मध्यस्थ बाजूला सारून थेट मालाचा पुरवठा खरेदीदारांना का करू नये. तर विक्रेत्यांनीही थेट शेतकर्यांशी संपर्क साधून कृषीमालाचे व्यवहार पूर्ण करावेत, असे म्हटले. गोयल म्हणाले की, शेतकर्यांनी गटांच्या माध्यमातून उत्पादक व्हावे, त्याचबरोबर स्वतःची विपणन व्यवस्था उभी करावी.त्यासाठी शेतकर्यांचे संघटन महत्वाचे आहे. शेतकर्यांनी विद्यमान संघटनांवर विसंबून राहू नये, कारण ज्यावेळी बाजार समित्यांमध्ये दरांचे चढ-उतार होता. तेव्हा अशा संघटना दूटप्पी भूमिका घेत असतात. शेतकरी परदेशात माल पाठविण्यासाठी उत्तम दर्जा राखतात. पण मागणी अधिक असतानाही त्यांना तो माल निर्यात कसा करावा, याचे दिशादर्शन होत नाही.त्यामुळे ते निर्यात करताना चाचपडत असतात.
पिकांसाठी केलेला खर्च काढून नफा कमविण्यासाठी शेतकर्यांना पर्यायी बाजारपेठा शोधणे फार गरजेचे झालेले आहे. त्याचबरोबर शहरी भागात सेंद्रिय पिकांची मोठी गरज भासत असून त्यामुळे युवा शेतकर्यांनी असे पिके घेण्यासाठी आणि ते बाजारपेठेत पाठविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. सुधीर गोयल यांनी केले. यावेळी उपस्थित कृषी उत्पादक कंपनी प्रतिनिधी आणि खरेदीदारांनी प्रश्न विचारलीे. कार्यक्रमाला विविध भागातून शेतकरी, कृषी निविष्ठा विके्रते, अन्न प्रक्रिया उद्योजक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





