स्मार्ट शेती काळाची गरज:- विश्‍वास नागरे- पाटील ; कृषीथॉन युवा प्रगतशील कृषी पुरस्काराचे वितरण

Nov 25, 2019

गेल्या काही वर्षांत शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांशी सामना करत प्रतिकुल परिस्थितीत शेती करत आहेत. मराठवाड्यासारख्या भागात पाण्याअभावी शेतीचे वाळवंट होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. तर इतर भागांत वेग-वेगळ्या संकटांचा तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेकर्‍यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट शेती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्‍वास नागरे -पाटील यांनी केले.
ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सोमवारी (दि.25) रोजी कृषीथॉन युवा प्रगतशील शेतकरी पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. राज नगरकर, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नाडाचे विजय नाना पाटील, लोकेश शेवडे, संजय न्याहारकर, अ‍ॅड. पी.आर. गिते, अंकुश पटवळे, अरूण मुळाणे, सतीष सोनवणे, संजय फडोळ, साहिल न्याहारकर, आश्‍विनीताई न्याहारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त विश्‍वास नागरे – पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वी शेकडो एकरात असलेल्या जमिनींचे तुकडे पडून शेतकरी अल्पभुधारक झाले आहेत. त्यातच गेल्या काही वषार्ंत शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांशी समना करत आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात शिक्षणाची फी भरू शकत नसल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. की विदारक परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढावली आहे. मात्र, शेतकर्‍यांनी खचून न जाता आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्रधान्य दिले पाहिजे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्याची दिलेली शिकवण अंमलात आणली आणण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच भारत हा कृषी प्रधान देश असून कृषी क्षेत्रात समृद्धी असली तरच देशातील इतर उद्योग, व्यवसाय तग धरू शकतील. त्यामुळे शेतीच्या समृद्धीसाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. युवा शेतकर्‍यांनी प्रतिकुल परिस्थितीत देखील हार न मानता प्रयोगशील शेती करून घेतलेले उत्पन्न कोैतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी नागरे-पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शेती विषयक विचारांची आठवण करून देताना सरदार पटेल परदेश दौर्‍यावर असताना त्यांना भारतीय संस्कृतीविषयी विचारले असता त्यांनी भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती असल्याचे सांगितले होते.यावरून देशातील कृषी क्षेत्राचे महत्व आधोरेखीत होत असल्याचे सांगितले.
डॉ. राज नगरकर यांनी, निरोगी आरोग्यासाठी शेतकर्‍यांनी विषमुक्त शेती करण्याची गरज असून आरोग्य सदृढ असेल तरच देश सक्षम होइल असे सांगितले. तसेच पिकांवर रासायनिक खते, औषधांच्या वापर टाळण्याचे आवाहन युवा शेतकर्‍यांना केले.
अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी तरूणवर्ग शेती व्यवसायाकडे वळत आहे, ही बाब सकारात्मक असून युवकांनीच शेतीक्षेत्रला नवाआयाम मिळवून देण्याचे आवाहन केले.
प्रस्ताविकात कृषीथॉनचे आयोजक श्री संजय न्याहारकर यांनी 1998 साली सुरू झालेल्या पहिल्या कृषीथॉनचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले होते. तेव्हापासून आजतागयात सुरू असलेल्या कृषीथॉनने शेतकर्‍यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, मार्गदर्शने शिबिरे व उपक्रमांतून शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्याचे काम केले असून केवळ व्यवसायिक दृष्टीकोण न बाळगता कृषीथॉन समाजभिमुख करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
आभार साहिल न्याहारकर यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वसंत ढिकले यांनी मानले. कार्यक्रमाला युवा शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते

कृषीक्षेत्राच्या समृद्ध वाटचालीत कृषीथॉनचा वाटा
श्री.संजय न्याहारकर यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्‍यांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांची शेतकर्‍यांविषयी असलेली तळमळच कृषीथॉनला आंतराष्ट्रीयस्तर घेऊन गेली असून प्रदर्शनाच्या माध्यमातून जगातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्यास मदत होत आहे. कृषीक्षेत्राच्या समृद्ध वाटचालीत कृषीथॉनचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे गौरव उद्गार यावेळी विश्‍वास नागरे- पाटील यांनी काढले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News