२६/११ हल्ल्यातील शहिदांना युवक राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली

Nov 26, 2019

 मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षं पूर्ण झाली.  या हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गंगापूर रोड वरील शहीद सर्कल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

          या हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल ६० तास वेठीस धरले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलाचेही मोठं नुकसान झालं. पोलीस दलातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहिद झाले होते. मात्र याआधी त्यांनी आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत प्राणाची बाजी लावत ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या आणि शूर पोलीसामुळे भारताला पाकिस्तानविरोधातला सगळ्यात मोठा जिवंत पुरावा म्हणजेच दहशतवादी कसाब हाती लागला होता. तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे, कॅप्टन संदीप उन्नीकृष्णन यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सगळ्या वीरांच्या बलिदानाचं स्मरण करून गंगापूर रोड वरील शहीद चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

          याप्रसंगी कार्याध्यक्ष अॅड.चिन्मय गाढे, डॉ.संदीप चव्हाण, सचिन जोशी, संतोष भुजबळ, सचिन बिडकर, करण आरोटे, भूषण गायकवाड, दत्तात्रय माळोदे, संतोष पुंड, लालसिंग जाधव, रोहित जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News