गो गॅस नेमणार जिल्हयात वितरक ; ऑटो एलपीजी वितरण केंद्र भारतभर सुरु

Dec 10, 2019

का दयावी गो गॅस सिलिंडरला पसंती ?
1.एलिट सिलिंडर ‘ब्लास्ट प्रूफ’
2 .जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळता येणारे
3.एलिट कॉम्पोझिट गॅस सिलेंडर्स अतिशय हलक्या वजनाचे
4. सिलिंडर्स संचय पारदर्शक
5.गॅसची मात्रा सहजपणे तपासता येणे शक्य

नाशिक : कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड(CPIL) ही एक आघाडीची खाजगी एलपीजी बॉटलर आणि विपणन कंपनी आहे. गोगॅस आणि गो गॅस एलिट या नावाने कंपनी एलपीजी पॅक्ड सिलेंडर मध्ये विक्री करीत आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे . 

गोगॅस एलिट- कॉम्पोझिट गॅस सिलेंडर हे एक क्रांतिकारी पाऊल असून येत्या काळात भारतीय स्वयंपाकघरात परिवर्तन घडवेल. २०१८-१९ मध्ये एलपीजीच्या मागणीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे.एलपीजी च्या वापरातील वाढीस विविध सरकारी योजनांनी पाठिंबा प्राप्त झाला आहे.
पहिले म्हणजे एलिट कॉम्पोझिट गॅस सिलेंडर्स हे अतिशय हलक्या वजनाचे असतात. ते महिला व मुलांना सहज रित्या उचलता येतात . दुसरे म्हणजे एलिट सिलिंडर्सचे संचय पारदर्शक असते ज्यामुळे सिलिंडर्समध्ये गॅसचे प्रमाण नेहमीच दिसून येते.ह्या मुळे हे सुनिश्चित होते की योग्य प्रमाणात गॅसपुरवठा केला जातो आणि सिलिंडरमध्ये नेहमी उपलब्ध गॅसची मात्रा सहजपणे तपासता येते. तथापि, कमी गॅस पुरविला जात आहे किंवा गॅस चोरीचीही चिंता नसते . ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे एलिट सिलिंडर ‘ब्लास्ट प्रूफ’ आहेत. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान होत नाही आणि वापरणे अत्यंत सुरक्षित असते .
30 किलो सिलिंडर हाताळणे कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीसाठी कठीण आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार 23 किलोग्रामपेक्षा जास्त वजन घेणे चांगले नाही, कारण त्यामुळे मणक्याचे नुकसान होऊ शकते. एलिट 2 आणि 5 किलो कॉम्पोझिट गॅस सिलेंडर्स विद्यार्थी, वसतिगृहे, रुग्णालये, सहली आणि पार्ट्यांसाठी अत्यंत सोयीस्कर असतात .

गेल्या 50 वर्षात जग हे नव्या प्रकाराकडे वळले आले ,गॅस सिलिंडर्सच्या डिझाइनमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत.. गो गॅस एलिटने पहिल्यांदाच भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. हे सिलिंडर्स भारत सरकारच्या पेसो विभाग ने प्रमाणित केले आहेत . प्रत्येकजण जो आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घेतो तो निश्चितपणे या नवीन वजनाने हलके सिलिंडर वापरण्यास सुरवात करेल.
एलपीजी सिलिंडर्स व्यतिरिक्त सीपीआयएलने भारतभरात २०० हून अधिक ऑटो एलपीजी वितरण केंद्रे सुरू केली आहेत आणि ‘गो गॅस ‘ या ब्रँड नावाखाली तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना ऑटो इंधन देणे सुरु केले आहे . सीपीआयएलचे गो गॅस ऑटो एलपीजी आज एक आघाडीची ब्रँड म्हणून उदयास आले आहे आणि कंपनी ऑटो एलपीजी क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. हरित इंधनाचा प्रचार करुन , वाहन प्रदूषण कमी करून सीपीआयएल पर्यावरण वाचविण्यात मोठे योगदान देत आहे.
सीपीआयएल चे आज 1,500 हून अधिक डीलर्सचे विशाल आणि विश्वासू नेटवर्क एकत्रितपणे वाढत आहे आणि गुंतवणूकदार, भागधारक, सहयोगी आणि कर्मचार्‍यांना योग्य मूल्य देत आहे. मार्ग आव्हानांनी भरलेला असला तरी आमची विकासाचे उद्धिष्ट सध्या करण्याचा कंपनीला विश्वास आहे. कंपनी चांगली प्रगती करीत आहे आणि पुढील दोन वर्षात अपेक्षित विकास साधण्याचा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर विस्तार करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कंपनी करेल अशी माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर शैलेंद्र वैदय आणि बिझनेस डेव्हलपमेंट हेड सुमीत बाध्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News