नाशिक : सुला विनियार्ड्स संगीत प्रेमींसाठी पुन्हा एकदा त्यांचा लाडका भारतातील सर्वात मोठा आणि जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव घेऊन आले आहेत. यंदाचा तेराव्या हंगामातील सुलाफेस्ट 2020 येत्या 1 आणि 2 फेब्रुवारीला होत आहे. सुला विनियार्ड्सच्या यशस्वी वाटचालीचे वीसावे वर्षे साजरे करतांना यंदाचा महोत्सव आणखी भव्य आणि उत्तम स्वरूपात आयोजित केला आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात असलेल्या सुला विनियार्ड्सच्या प्रांगणात सुलाफेस्टच्या तयारीला वेग आला असून, यंदाचा महोत्सवदेखील संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
या दोन दिवसीय संगीत महोत्सवात दिग्गज कलावंताचे सादरीकरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यातच ब्रिटिश चार्ट टॉपर ‘हॉट चिप’ आपले भारतातील पाहिले सादरीकरण सुलाफेस्टच्या व्यासपीठावर करणार आहेत. तर ‘सलीम-सुलेमान’ ही भारतातील लोकप्रिय जोडी या महोत्सवात बॉलिवूड तडका लावणार आहेत.
अत्यंत आकर्षक लाईनअप मध्ये प्रसिद्ध डच-न्यूझीलंड ट्रायो, ‘माय बेबी’ (ज्यूट वेन डिजडिजिकक, कॅटो वन डिजिक आणि डॅनियल दफ्रीझ, जॉनस्तोन) यांच्या तर्फे त्यांच्या अनोख्या शैलीतील सादरीकरण होणार आहे. ‘द लोकल ट्रेन’ (रामित मेहरा, रमण नेगी, साहिल सरीन आणि पराग ठाकूर) यांच्याकडून हिंदी गाण्याची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. सुलाफेस्ट सर्वांसाठी पर्वणी ठरणार असून या उत्साहवर्धक वातावरणात सहभागी होण्याची चांगली संधी उपलब्ध आहे.
धमाकेदार संगीतासोबत वाईनविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. हे सर्व करत असताना आलेला थकवा घालवत काही क्षण ‘विनो स्पा’ येथे घालवण्याची संधी असणार आहे. सकाळी योगाचे सत्र, सायकलिंग आनंद द्विगुणित करणारा अनुभव ठरेल. त्यातच लागलेली भूक भागविण्यासाठी पिज्जा पासून तपस किंवा लंचेऑन येथे तृप्त करणारे पदार्थांवर ताव मारता येईल. सोबत नवनवीन मित्र बनवायची तर संधी आहेच. बझार येथे दिलेली भेट नक्कीच तुम्हाला खरेदीचा निखळ आनंद मिळवून देणारी ठरेल. खरेदीचे भरपूर पर्याय येथे उपलब्ध असतील.
इतकेच नव्हे, तर प्रत्येक तिकीट विक्री इतके रोपट्यांची लागवड सुला विनियार्ड्स तर्फे केली जाणार आहे. या माध्यमातून देशातील सर्वात शाश्वत संगीत महोत्सव म्हणून नावलौकिक मिळविण्याचा उद्देश असेल.
तयारी अंतिम टप्प्यात आलेली असल्याने आत्ताच सहभागी होण्याचे नियोजन करायला हरकत नाही. सुला विनियार्ड्स तुमच्या आयुष्यातील अनमोल क्षण नावारूपाला आणण्यासाठी सज्ज झाले आहे.
सुला विनियार्ड्स विषयी
बाजारपेठेतील प्रमुख आणि गेल्या दोन दशकांपासून भारतीय वाईनमध्ये लोकप्रिय असलेला, सुला विनियार्ड्स हा भारतीय वाईनचा समृध्द वारसा विशद करत आहे. वाईन टुरिझम ही संकल्पना रुजवितांना वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणुन नाशिकची ओळख निर्माण करण्यात सुलाचे मोठे योगदान आहे.
2005 मध्ये देशातील पहिले वाईन टेस्टिंग रूम साकारले. तर ‘बियॉंड बाय सुला’ हे पहिले विनियार्ड रिसॉर्ट साकारण्याचा बहुमान सुलाला मिळाला आहे. संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत यांच्या दूरदृष्टिकोनातून या संकल्पना साकार झाल्या आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अन गंगापूर धरण परिसरातील ‘बियॉंड बाय सुला’ पर्यटकांचे लक्ष वेधनारा ठरतो आहे. वाईन टुरिझमला चालना देतांना ‘द सोर्स ऍट सुला’ची उभारणी 2017 ला झाली. देशातील पहिले हेरिटेज वाईनरी रिसॉर्ट होण्याचा बहुमानमिळालेल्या या रिसॉर्टच्या माध्यमातून अनोख्या विनियार्ड जीवनशैलीची अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जागतिक दर्जाच्या उभारणीमुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांसाठी सुट्यांच्या काळात पसंतीचे ठिकाण बनले आहे.
सुला विनियार्ड्स हे जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक भेट देणाऱ्या वाईनरी पैकी एक असून, दरवर्षी येथे 4 लाखहून अधिक लोक येत असतात. लोक आयुष्यात प्रथमच वाईनची चव घेत असणाऱ्या अव्वल ठिकाणांमध्ये सुलाचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त वाईनची शृंखला देशभरातील नामांकित हॉटेल्स आणि रेस्टोरंट्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ही वाईन 30 हून अधिक देशांमध्ये निर्यातदेखील केली जात आहे. सुलाने वाईन आणि स्पिरीट टुरिझमला चालना दिल्याबद्दल नामांकित असा ड्रिंक्स बिझनेस अवॉर्ड 2016 हा पुरस्कार पटकावला आहे. प्रथमच कुठल्या भारतीय कंपनीने हा बहुमान मिळवला आहे. जुलै 2018 मध्ये 10 लाख (1मिलियन) वाईन केस विक्री करणारी भारतातील पहिली कंपनी होण्याचा विक्रम नोंदविला आहे. नुकताच झालेल्या इंडिया वाईन अवॉर्डस 2019 मध्ये सुला विनियार्ड्सने 13 पुरस्कार पटकावले आहेत. आपल्या ग्राहक संख्येत वाढ करतांना सुला विनियार्ड्सने प्रथमच चेनिन ब्लँक, झिंफंडेल, सौविग्निन ब्लँक भारतात उपलब्ध करून दिले आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये सुलातर्फे ‘काडू’चे अनावरण करण्यात आले, ही भारतातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन असून वाघांचे संवर्धन आणि सरंक्षणासाठी योगदान देत आहे. ही वाईन सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उपलब्ध आहे.
राजीव सामंत यांच्या संसाधने संवर्धन करण्यात दृढ विश्वास असून यातून शाश्वत वाटचाल हा सुलाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग बनला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रँड हा रिड्यूस, रियुज आणि रिसायकल या तत्वांच्या आधारे जगातील शाश्वत वाईनरीपैकी एक बनला आहे.
विनियार्ड्स जीवनाचा आनंद अनुभवता यावा या उद्देशाने सुला फेस्ट हे व्यासपीठ सुलाने उपलब्ध करून दिले आहे. या दोन दिवसीय मोहोत्सवातून संगीत आणि वाईनच्या विश्वात रमण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. भारतातील पहिले विनियार्ड्स संगीत मोहोत्सवचे यावेळच्या तेराव्या हंगामात जागतिक स्तरावरील नावाजलेले कलावंत घेऊन येत आहे. आगामी सुला फेस्ट 2020 हा भव्य दिव्य स्वरूपाचा होणार असल्याची ग्वाही देतो. भारतातील नामांकित वाईन ब्रँड म्हणून दोन दशकांचा यशस्वी प्रवास पूर्ण करतांना संगीत प्रेमींसाठी धम्माल करण्याची संधी घेऊन आला आहे. इतकेच नाही तर प्रत्येक तिकीट विक्रीसोबत सुला विनियार्ड्सतर्फे रोपटे लावतांना देशातील सर्वात शाश्वत संगीत मोहोत्सव म्हणूनदेखील नावलौकिक मिळवणार आहे.





