अग्रवाल सखी मंच तर्फे भव्य “विंटर फेस्ट”चे आयोजन

Dec 17, 2019

गंगापूररोड वरील ‘इंद्रप्रस्थ हॉल’ येथे सालाबादप्रमाणे यंदाही अग्रवाल सखी मंचच्या वतीने भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील गरजू व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते. या प्रदर्शनास पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या सि.ई.ओ. भुवनेश्वरी मॅडम उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात महिलांसाठी विविध कपडे, दागिने, पर्स, फुटवेअर आदींसह आकर्षक भेटवस्तू, शोभेच्या वस्तू आणि खाण्या – पिण्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. १७ आणि १८ डिसेंबर २०१९ दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ नाशिकरांनी घेऊन समाजकार्यास हातभार लावण्याचे आवाहन अग्रवाल सखी मंचच्या अध्यक्षा रुची चांद यांनी केले आहे.
आजवर या प्रदर्शनाच्या माध्यमातून १५० पेक्षा अधिक कॅटरॅक्ट रुग्णांना शस्रक्रियेसाठी मदत केली आहे. तर महानगर पालिका शाळेतील दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून दिले आहे. आणि २० दिव्यांगांना जयपूर फूट भेट देऊन त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त अग्रवाल सखी मंचतर्फे कँसर पीडित रुग्णांना देखील उपचारासाठी मदत केली जात आहे. अंध मुलांच्या शाळेत मशीन दान करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांग मुलांच्या वस्तीगृहामध्ये कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पाणपोई देखील बसविण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News